११ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
११ डिसेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 11 December 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

११ डिसेंबर चालू घडामोडी

निर्बंध असतानाही मानवी दृष्टिकोनातून मदत करण्याच्या ठरावावर भारत तटस्थ:

 • निर्बंधात्मक कारवाईतून मानवतावादी दृष्टिकोनातून केलेली आर्थिक आणि साधनात्मक मदत वगळण्यात यावी, या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील ठरावावर भारत तटस्थ राहिला.
 • अशा प्रकारच्या अपवादांचा गैरवापर करून आपल्या शेजारी देशांत (पाकिस्तान) दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि निधीची मदत झाल्याची भूमिका भारताने या वेळी मांडली.
 • 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे.
 • अमेरिका आणि आर्यलड यांनी मांडलेल्या या ठरावात म्हटले आहे की, (एखाद्या देशाविरुद्ध) निर्बंध लादताना त्यात मानवतवादी दृष्टिकोनातून केलेल्या मदतीचा अपवाद करण्यात यावा.
 • हा ठराव मान्य झाल्यास मदतीअभावी होणारे अनेक मृत्यू थांबविता येतील, असा दावा अमेरिकेने केला आहे.
 • या ठरावाला भारताचा अपवाद वगळता अन्य सर्व 14 सदस्य देशांनी पाठिंबा दिला.
 • या ठरावात म्हटले आहे की, मानवतावादी दृष्टिकोनातून वेळीच मदत व्हावी यासाठी आर्थिक निधी पुरविणे, अन्य आर्थिक मदत, आर्थिक स्रोत पुरविणे, वस्तू आणि सेवा स्वरूपात मदत देणे या बाबींना परवानगी असावी.
 • अशी मदत ही सुरक्षा परिषद किंवा तिच्या निर्बंध समितीने जारी केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन मानले जाणार नाही.

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदर सिंग सुखू:

 • हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचलचे नवे मुख्यमंत्री होतील, असे पक्षातर्फे शनिवारी घोषित करण्यात आले.
 • पक्षश्रेष्ठींनी हमीरपूर जिल्ह्यातील नादौन येथून निवडले गेलेले 58 वर्षीय आमदार सुखू यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केले आहे.
 • उपमुख्यमंत्रीपदासाठी मुकेश अग्निहोत्री यांची निवड झाली असून ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.
 • दरम्यान, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी रविवारी होणार असल्याचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी जाहीर केले.
 • हिमाचल प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष सुखू हे चार वेळा आमदारपदी निवडून गेले आहेत.

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा भूपेंद्र पटेल:

 • नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्ता कायम राखणाऱ्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाने शनिवारी विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची नेता म्हणून निवड केली.
 • त्यामुळे पटेल सलग दुसऱ्यांदा राज्याची धुरा सांभाळणार आहेत.
 • विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पटेल यांनी राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली व सरकार स्थापनेचा दावा केला.
 • 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत 156 जागांवर भाजपचा विजय झाला आहे.
 • 12 डिसेंबर रोजी गांधीनगर येथील नवीन सचिवालयाजवळील हेलिपॅड मैदानावर पटेल राज्याचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

इशान किशन आणि विराट कोहलीने रचला नवा इतिहास:

 • बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे.
 • बांगलादेशविरुद्ध इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वात मोठी भागीदारी केली आहे.
 • 8 वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्यात 213 धावांच्या भागीदारीचा विक्रम होता पण या दोन्ही फलंदाजांनी हा विक्रम उद्ध्वस्त केला आहे.
 • बांगलादेशविरुद्ध भारताकडून कोणत्याही विकेटसाठी इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वाधिक धावांची भागीदारी केली आहे.
 • #IshanKishan आणि #ViratKohli मधील भागीदारी भारतासाठी तिसरी सर्वोच्च आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सातव्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी आहे.
 • इशान किशन आणि विराट कोहली यांनी 213 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे.

द्विशतकाने इशान किशनने काढले अनेक विक्रम मोडीत:

 • भारत आणि बांगलादेश या संघात एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामना चट्टोग्राम येथे खेळला आहे.
 • बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने अनेक इतिहास रचले.
 • एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो चौथा भारतीय ठरला आहे.
 • इशान किशनने केवळ 126 चेंडूत 200 धावा पूर्ण केल्या.
 • भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये इशान किशनच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी द्विशतके झळकावली आहेत.
 • मात्र, इशानने केवळ 125 चेंडूत द्विशतक झळकावले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

११ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.