१३ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१३ फेब्रुवारी चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |13 February 2024

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१३ फेब्रुवारी चालू घडामोडी

आता महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार

  • राष्ट्रीय पातळीवर राज्याचा लौकिक उंचावणाऱ्या खेळाडू, संघटना आणि प्रशिक्षकांना प्रोत्साहन म्हणून या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून (एमओए) राज्य क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत. याबाबतची घोषणा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने रविवारी केली.
  • महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बोट क्लब येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेममध्ये हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडामंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त राजेश देशमुख यांच्यासह राज्य ऑलिम्पिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य बैठकीस उपस्थित होते.
  • बैठकीदरम्यान अजित पवार यांनी क्रीडाक्षेत्रात गेल्या वर्षभरात यशस्वी कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती चांगल्या प्रकारने नांदत असून, ती आणखी कशी सशक्त होईल यासाठी राज्य शासन, क्रीडा आयुक्तालय आणि क्रीडा संघटना यांच्यात समन्वय राहून काम करण्याची सूचनाही पवार यांनी केली. महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनाचा उपयोग कसा केला जावा, तेथे काय असावे याबाबतही पवार यांनी मार्गदर्शन केले. त्याच वेळी लक्ष्यवेध ही योजना योग्य पद्धतीने राबवली जाईल आणि यातून संघटना दूर राहणार नाहीत याची काळजी घेण्याचेही पवार यांनी सूचित केले.
  • बैठकीनंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वर्षीपासून सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटना, राज्य संघटना, सर्वोत्कृष्ट खेळाडू (पुरुष व महिला), क्रीडा मार्गदर्शक (पुरुष व महिला) असे पुरस्कार दिले जातील. यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेकडून प्रायोजक शोधला जाईल किंवा कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी यासाठी कसा वर्ग करता येईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

कुठे आहे राज्यातले एकमेव गणेश पंचायतन जाणून घ्या….

  • माघी गणेशोत्सवानिमित्ताने अलिबागच्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यातील गणेश मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली आहे. राज्यातील एकमेव गणेश पंचायतन म्हणून या गणेश मंदीराची ओळख आहे. अशीं मंदीर देशात फारशी आढळत नाही. या गणेश पंचायतनाची स्थापना कशी झाली जाणून घेऊया…
  • सागरी सिमांचे परकीय आक्रमणांपासून संरक्षण करता यावे यासाठी १६८० मध्ये कुलाबा किल्ल्याची उभारणी करण्यात आली. अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा सागरी किल्ला असून ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आजही भक्कम स्थितीत उभा आहे. मराठा आरमाराच्या जाज्वल्य इतिहासामुळे किल्ल्याचे महत्व आहेच, पण त्याच बरोबर येथील गणेश पंचायतन मंदीर हे देखील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

मंदिराचे बांधकाम

  • संपुर्ण काळ्या दगडात बांधण्यात आलेल्या या मंदिराची उभारणी थोरल्या राघोजी राजे आंग्रे यांनी केली होती. १७५९ मध्ये या मंदीराचे बांधकाम करण्यात आले. मंदिराच्या प्रवेश द्वारावर डाव्या बाजूला कार्तिकस्वामी तर उजव्या बाजूला गणेशाची प्रतिमा कोरली आहे. मंदीराचे सभागृह अष्टकोनी आहे. मंदीराच्या उजव्याबाजूला महादेवाचे आणि उजव्याबाजूला हनुमानाचेही मंदीर आहे.

गणेश पंचायतन

  • कुलाबा किल्ल्यात पोखरणीच्या पश्चिमेस गणेशाचे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात चौथऱ्यावर मध्यभागी उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची सुंदर मूर्ती आहे. पुढील बाजूस डावीकडे शंकर, उजवीकडे विष्णू, मागील बाजूस उजवीकडे सुर्य आणि डावीकडे देवीची मुर्ती आहे. पाच मुर्तींचा समूह या मंदीरात असल्याने या मंदिराला गणेश पंचायतन असे संबोधले जाते. अशा प्रकारे गणेश पंचायतन असलेले हे राज्यातील एकमेव गणेश मंदीर आहे. नेपाळ मध्ये अशी गणेश पंचायतन मंदिर आढळतात.

“रामायण, महाभारत काल्पनिक..”, हे शिकवलं गेल्याने आंदोलन! शाळेने केलं शिक्षिकेचं निलंबन, कुठे घडली घटना?

  • रामायण आणि महाभारत काल्पनिक आहे. हे शिकवणाऱ्या आणि मोदींबाबत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं आहे. भाजपा आमदारांनी या शिक्षिकेवर आरोप केला की त्यांनी रामायण आणि महाभारत हे काल्पनिक असल्याचं विद्यार्थ्यांना शिकवलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केली. तसंच शिक्षिकेने हे शिकवल्यानंतर त्याविरोधात दक्षिणपंथीय समूहाने आंदोलन केलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर शाळेने शिक्षिकेला निलंबित केलं आहे.

कुठे घडली ही घटना?

  • बंगळुरु येथील सेंट गेरोसा इंग्लिश एचआर प्रायमरी शाळेत ही घटना घडली आहे. या शाळेतल्या शिक्षिकेविरोधात असाही आरोप आहे की २००२ च्या गोध्रा दंगलींचा उल्लेख करत आणि बिल्किस बानो प्रकरणाचा उल्लेख करत या शिक्षिकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्यं केली. या शिक्षिकेने लहान मुलांच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही या शिक्षिकेविरोधात आंदोलन करत आहोत असं दक्षिण पंथीय समूहाने सांगितलं. तसंच आम्हाला आता भाजपाची साथ लाभली आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यावेळी शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. ज्यानंतर या शिक्षिकेचं निलंबन करण्यात आलं आहे.
  • या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते आहे. शाळेने या शिक्षिकेने जे वक्तव्य केल्याचा आरोप केलाय त्यावरुन शिक्षिकेला निलंबित केलं आहे. शाळेने असंही म्हटलं आहे की सेंट गेरोसा शाळेच्या ६० वर्षांच्या इतिहासात अशी कोणतीही घटना घडलेली नाही. या घटनेमुळे मात्र एक प्रकारचा अविश्वास समाजात निर्माण झाला आहे. आम्ही पुन्हा एकदा नव्याने समाजात आमच्याबाबतचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करु. तसंच सगळ्यांच्या भल्यासाठी आणखी चांगल्या पद्धतीने काम करु असं शाळेने म्हटलं आहे. टाइम्स नाऊने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका, भारताच्या परराष्ट्र नीतीचं मोठं यश

  • भारताची कूटनीती यशस्वी ठरली असून कतारने ज्या आठ माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची सुटका केली आहे. भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता. कतारने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्यांना आवाहन केलं, तसंच त्यांच्याविषयीची जी कागदपत्रं होती त्यांची पूर्तताही केली. त्यानंतर या सगळ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात आली. मात्र आता ही बातमी येते आहे की या आठही माजी नौसैनिकांची सुटका करण्यात आली आहे. यापैकी सात जण मायदेशी परतले आहेत.
  • कतारमध्ये ज्या आठ भारतीय माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यांची कतारने सुटका केली. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. आठपैकी सातजण भारतात परतले आहेत. या नागरिकांची घरवापसी झाली याचा आम्हाला आनंद आहे अशी प्रतिक्रिया आता परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

भारतमाता की जय चे नारे

  • भारतात जेव्हा माजी नौसैनिक परतले तेव्हा दिल्ली विमानतळावर त्यांनी भारतमाता की जय या घोषणा दिल्या. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतार यांचेही या सगळ्यांनी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्या प्रकरणात हस्तक्षेप केला नसता तर आम्ही सुटका कठीण होती असंही या सगळ्यांनी म्हटलं आहे.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१३ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.