२० एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२० एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |२० April 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२० एप्रिल चालू घडामोडी

राज्यात दोन लाखांवर विद्यार्थी अवैध! जाणून घ्या काय आहे प्रकरण..

 • राज्यातील विद्यार्थी संख्या किती? याचा तपशील शाळा निहाय पटसंख्या मोजून ठरतो. तशी आकडेवारी शिक्षण विभागाकडे उपलब्ध असते. मात्र अधिकृत ३ लाख ६५ हजार ७७८ विद्यार्थी असून, त्यापैकी १ लाख २१ हजार ९९७ विद्यार्थीच वैध असल्याचे शिक्षण विभागाच्या संकेतस्थळाने नमूद केले. नेमके काय तर ही अधिकृत संख्या आधार सलग्न विद्यार्थ्यांची आहे. मंगळवारी दिवसभर अशी तपासणी झाली.
 • आधार असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व तत्सम लाभ देण्याचे धोरण आहे. त्यामुळे आधार संलग्न नसणारे विद्यार्थी अपात्र ठरल्याने गोंधळ उडतो. त्यासाठी अवैध ठरलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे इ आधार कार्ड प्रणालीत करणे आवश्यक ठरते. त्यानंतर स्टुडंट पोर्टलवर ते अद्यावत करणे भाग आहे.
 • पोर्टलवर सुरक्षित व अद्यावत केल्यानंतरच विद्यार्थी वैध ठरण्याचे प्रमाण वाढेल, असे मत एका शिक्षक नेत्याने व्यक्त केले. ही प्रक्रिया किचकट ठरू नये म्हणून उपाय व्हावे, अन्यथा अवैध विद्यार्थी लाभ वंचित ठरतील. त्याचा त्रास मुख्याध्यापकांना होणार.

‘या’ आहेत भारतातील पाच अतिश्रीमंत महिला; जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती

 • आपलं नाव श्रीमंतांच्या यादीत असावं असं कुणाला वाटत नाही? पण काही जणांचंच हे स्वप्नं पूर्ण होतं. पूर्वी नवऱ्याच्या संपत्तीवरच बायकोची श्रीमंती मोजली जायची. आता मात्र काळ बदलला आहे. त्यामुळे स्वत: उद्योजिका असलेल्या आणि अब्जावधींचा कारभार एकहाती चालविणाऱ्या अनेक उद्योगिनींचा समावेश अतिश्रीमंतांच्या यादीत होतो. ‘फोर्ब्स’च्या वतीने ही यादी दरवर्षी जाहीर केली जाते. भारतातील उद्योगपतींचा यामध्ये समावेश असतो हे आपल्याला माहिती आहेच. पण त्याचबरोबर फोर्ब्सच्या अतिश्रीमंतांच्या २०२३ सालच्या यादीत भारतीय महिलांनी बाजी मारली आहे. सावित्री जिंदाल या देशातील सर्वांत श्रीमंत महिला ठरल्या आहेत. सावित्री जिंदाल या प्रसिद्ध जिंदाल ग्रुपच्या अध्यक्ष आहेत. भारतीय श्रीमंतांची यादी, २०२३ मध्ये १६ नवीन नावे समाविष्ट झाली आहेत, त्यांतील तीन महिला आहेत. जाणून घेऊ या भारतातील या अतिश्रीमंत महिलांबद्दल-
 • १) सावित्री जिंदाल (संपत्ती – १७ दशकोटी डॉलर्स)
 • २) रोहिका सायरस मिस्त्री (संपत्ती – ७ दशकोटी डॉलर्स)
 • ३) रेखा झुनझुनवाला (संपत्ती- ५.१ दशकोटी डॉलर्स)
 • ४) विनोद राय गुप्ता (४ दशकोटी डॉलर्स)
 • ५) सरोज राणी गुप्ता (संपत्ती – १.२ दशकोटी डॉलर्स)

देशातील दुसरे Apple चे रिटेल स्टोअर ‘या’ शहरात होणार सुरू; ७० सदस्यांची टीम १५ भाषांमध्ये संवाद साधणार

 • दिल्लीमध्ये देशातील Apple च्या दुसऱ्या रिटेल स्टोअरची सुरुवात होणार आहे. Apple सीईओ टीम कूक स्टोअरचे उद्घाटन होणार आहे. परवा म्हणजेच १८ एप्रिल रोजी टीम कूक यांनी देशातील पहिल्या रिटेल स्टोअरचे उद्घाटन मुंबईमध्ये केले. दिल्लीमध्ये उभारण्यात आलेले हे रिटेल स्टोअर स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभारण्यात आले आहे. हे स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले आहे. आज सकाळी १० वाजल्यानंतर ग्राहक या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकणार आहेत. या स्टोअरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
 • Apple चे देशातील दूर रिटेल स्टोअर हे दक्षिण दिल्लीमधील सिलेक्ट सिटी वॉक मॉलमध्ये तयार करण्यात आले आहे. मॉलमधील पहिल्या मजल्यावर असणारे हे स्टोअर मुंबईतील फ्लॅगशिप स्टोअरपेक्षा खूपच लहान आहे. मात्र येथे ग्राहकांना Apple ची सर्व प्रॉडक्ट्स बघायला मिळणार आहेत.
 • तसेच दिल्लीमधील या स्टोअरमध्ये ७० सदस्यांची टीम काम करणार आहे. ज्यामध्ये ते १५ भाषांमध्ये संवाद साधणार आहेत. ज्यामुळे खरेदीदाराला प्रॉडक्ट खरेदी करताना आपलेपणा वाटणार आहे. सर्वांसाठी खुले असेल असे एक स्टोअर असावे अशी आमची कल्पना होती असेन Apple रिटेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष डियर्डे ओब्रायन म्हणाले. आमची टीमचे सदस्य स्थानिक ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आणि नवीन मार्ग शोधण्यात त्यांची मदत करण्यासाठी उत्सुक आहेत.
 • देशातील पहिले Apple रिटेल स्टोअर १८ एप्रिल रोजी मुंबईत सुरु झाले आहे. याचे उद्घाटन सीईओ टीम कुक यांनी केले. मुंबईच्या अ‍ॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत. याशिवाय अ‍ॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अ‍ॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा कोरण्यात आल्या आहेत . स्टोअरचे क्रिएटिव्ह “हॅलो मुंबई” या क्लासिक अ‍ॅपल टॅगलाइनअंतर्गत तुमचे स्वागत करण्यात आले.

मँचेस्टर मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधलं ते संबलपूरी साडीने!

 • ब्रिटनमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या मॅरेथॉन शर्यतीत भारतातील संबलपूरी साडीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं, ही बातमी नक्कीच वाचताना रोचक वाटेल, नव्हे ती आहेही! मँचेस्टर येथे नुकत्याच पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ओदिशाच्या मधुस्मिता जेना दास हिने आपल्या आगळ्यावेगळ्या वेशभूषेने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. मँचेस्टरनिवासी ४१ वर्षीय मधुस्मिता हिने भारतीय पारंपारिक हातमागावर विणलेली लालसर केशरी रंगातील संबलपूरी साडी परिधान करून ४२.५ किमी (सुमारे २६.४ मैल) अंतराची शर्यत ४ तास ५० मिनिटांत पूर्ण केल्याने प्रेक्षक थक्क झाले!
 • तिच्या ह्या कामगिरीची दखल अनेक ट्विटरयुजर्सनी घेतली असून भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे असे समयोचित प्रदर्शन केल्याबद्दल तिचे भरभरून कौतुकही केले आहे. ४२.५ किमी अंतराची ही स्पर्धा तशीही एवढ्या कमी अवधीत पूर्ण करणं हेच आव्हान असताना ओडिया मधुस्मिताने साडी नेसून ती पूर्ण करणं हे अधिक आश्चर्यकारक आणि आव्हानात्मक असल्याचं बऱ्याच नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. काही युजर्सनी मॅरेथॉनसारख्या स्पर्धेमध्ये असे पाऊल उचलणे हेच अभिनंदनीय असल्याचं म्हटलं आहे. काही युजर्सनी तिच्या या धाडसीपणाला सलाम केला आहे. काहींनी हा अभिमानाचा क्षण असल्याचंही लिहिलं आहे. मॅरेथॉनमधील तिच्या फोटोवर एका युजरने असं म्हटलं आहे की, खरंच इतका सुंदर फोटो पाहण्यासारखा आहे.
 • विदेशी कपड्यांना जास्त पसंती देणाऱ्यांनी आपली संस्कृती जगाला कशी दाखवायची, हे मधुस्मिताकडून शिकलं पाहिजे. एका ट्विटर युजरने स्पर्धेतील तिचा फोटो शेअर करत त्याखाली म्हटले आहे की, फोटोमधून तिचा पारंपारिक पेहरावात स्पर्धेत सहभागी होण्यामागचा दृढनिश्चय आणि आत्मविश्वास झळकतो. आदिवासी आणि समृद्ध संबलपूरच्या सांस्कृतिक वैशिष्ट्याचेही कौतुक त्याने केले आहे. मँचेस्टर मॅरेथॉन य ब्रिटनमधील सर्वात महत्त्वाच्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धेत वैभवशाली वारसा लाभलेल्या भारताच्या पारंपारिक पेहराव परिधान करून सहभागी होताना तिने कोणतेही दडपण घेतले नाही किंवा त्यामुळे स्वतःचे लक्ष विचलित होऊन दिले नाही, याबद्दलही काही युजर्सनी तिचे विशेष कौतुक केले आहे.

भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश, पुढली तीन दशके लोकसंख्यावाढ कायम; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

 • United Nations Population Report संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार आता भारताने लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकले आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली असून चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. विशेष म्हणजे भारताच्या लोकसंख्येत पुढली तीन दशके वाढ कायम राहणार असून त्यानंतर घट सुरू होईल, असे अनुमान संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने काढले आहे.
 • ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ (यूएनएफपीए) या संस्थेने ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट २०२३’ हा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये भारताची लोकसंख्या चीनपेक्षाही अधिक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार भारतामध्ये १५ ते ६४ या कमावित्या वर्षांमधील नागरिकांचे प्रमाण लोकसंख्येच्या ६८ टक्के आहे. शून्य ते १४ या वयोगटात २५ टक्के, १० ते १९ वयोगटात १८ टक्के, १० ते २४ वयोगटात २६ टक्के नागरिक आहेत.
 • ६५ वर्षांवरील निवृत्तीच्या वयातील नागरिकांचे प्रमाण अवघे सात टक्के आहे. देशात केरळ आणि पंजाब या राज्यांमध्ये वृद्धांची संख्या सर्वाधिक असून बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्ये तुलनेने ‘तरुण’ असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. १९५० पासून जागतिक लोकसंख्येची आकडेवारी संयुक्त राष्ट्रांमार्फत जाहीर होऊ लागली. त्यानंतर प्रथमच या यादीत भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
 • ‘यूएनएफपीए’च्या अंदाजानुसार २०५० सालापर्यंत भारताची लोकसंख्या १६६.८ कोटींपर्यंत गेली असेल तर त्यावेळी चीनची लोकसंख्या १३१.७ कोटींपर्यंत आक्रसण्याची शक्यता आहे. २०३० सालापर्यंत भारतातील वृद्धांची लोकसंख्या आताच्या बरोबर दुप्पट, १९.२ कोटी होईल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. २०५० सालापर्यंत दर पाच व्यक्तींपैकी एक भारतीय वृद्ध असेल. हे लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षा आणि आरोग्य यासाठी आगामी काळात नियोजन करावे लागेल, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.

२०४७ पर्यंत भारत अमली पदार्थमुक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही

 • देशातील अमली पदार्थाचे संकट अधिक तीव्र होऊ लागले असून हे रॅकेट निर्दयपणे मोडून काढले जाईल. अमली पदार्थ व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील. त्यासाठी सर्व राज्यांतील सरकारांच्या सहकार्याची गरज आहे. पण, त्यासाठी राज्य सरकारांना राजकीय मतभेद बाजूला ठेवावे लागतील. केंद्र व राज्ये यांच्या एकत्रित प्रयत्नांतून २०४७ पर्यंत भारत अमली पदार्थमुक्त केला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी दिली.
 • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अमली पदार्थविरोधी कृती दलाच्या प्रमुखांच्या पहिल्या परिषदेत शहा बोलत होते. अमित शहा म्हणाले की, २०४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून १०० वर्षे पूर्ण होतील. पुढील २७ वर्षांमध्ये देश अमली पदार्थमुक्त करण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवले असून ते पूर्ण केले जाईल. देशातील अमली पदार्थाच्या समस्यांना व्यापारीच प्रामुख्याने जबाबदार असून त्यांच्यामुळे तरुण अमली पदार्थाच्या आहारी जातात. म्हणूनच अमली पदार्थाच्या व्यापाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

वर्षभरात ६ लाख किलो अमली पदार्थ जप्त

 • जून २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात ७ हजार ११७ कोटी रुपये किमतींचे ६ लाख ७३ हजार ६०७ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. २००६ ते १३ या सात वर्षांमध्ये १ हजार २५७ गुन्हे दाखल केले गेले तर, १ हजार ३६३ जणांना अटक झाली. १ लाख ५२ हजार २०६ किलो अमली पदार्थ जप्त केले गेले. या अमली पदार्थाची किंमत ५ हजार ९३३ कोटी होती. २०१४ ते २२ या काळात ३ हजार ५४४ गुन्हे नोंदवण्यात आले असून ५ हजार ४०८ जणांना अटक झाली. १५ हजार ८७६ कोटींचे ३ लाख ७३ हजार ४९५ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
 • केंद्र सरकारच्या बहुविध उपायांमुळे अमली पदार्थ जप्त होण्याच्या प्रमाणात १४५ टक्के वाढ झाली. तर गुन्ह्यांच्या नोंदणीमध्ये १८१ टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) दिली आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२० एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.