१९ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
१९ एप्रिल चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |19 April 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

१९ एप्रिल चालू घडामोडी

सूर्यकुमारनंतर हरमनप्रीत कौरने केली मोठी कामगिरी, १६ वर्षांनंतर मिळणार हा विशेष सन्मान

  • या दोन देशांमध्ये आयपीएलची जबरदस्त क्रेझ सुरू आहे आणि दररोज प्रत्येक सामन्यातील धडाकेबाज खेळी पाहण्यासाठी सर्व चाहते रोमांचित झाले आहेत. दरम्यान, चाहत्यांना आनंदाने उड्या मारण्याची संधी देणारी बातमी आली असून यामध्ये महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंची चर्चा झाली. तसेच, या खेळाडूने भारतीय महिला क्रिकेटच्या वतीने इतिहास रचला आहे, कारण पहिल्यांदाच महिला खेळाडूने विस्डेन क्रिकेट पुरस्काराच्या यादीत स्थान मिळवले आहे.

हरमनप्रीत कौरने इतिहास रचला, विस्डेनमध्ये नामांकन

  • भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही १८८९च्या परंपरेनुसार विस्डेन व्यवस्थापनाने निवडल्याप्रमाणे ‘विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर’ म्हणून नावाजलेली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या यादीतील इतर खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर त्यात न्यूझीलंडचे टॉम ब्लंडेल आणि डॅरिल मिशेल आणि त्यांच्यासोबत इंग्लंडचे बेन फोक्स आणि मॅथ्यू पॉट्स आहेत.
  • हरमनप्रीत कौरने या यादीत स्थान मिळवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कॅंटरबरी येथे १११ चेंडूत १४३ धावांची तिची शानदार खेळी ज्यामुळे भारताला १९९९ नंतर इंग्लिश भूमीवर पहिली वन डे मालिका जिंकण्यात मदत झाली. हरमनप्रीतने बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भारताचे नेतृत्व केले. सबमिट वर्ग सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

हरमनप्रीत कौरशिवाय ‘या’ महिला क्रिकेटपटूंचीही नावे समोर आली आहेत

  • यामध्ये हरमनप्रीत कौर व्यतिरिक्त अनेक महिला क्रिकेटपटूंनी नामांकन मिळाले आहेत. विस्डेनच्या या यादीत ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेथ मुनीचा समावेश आहे, जिने गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा येथे आपले नाव नोंदवले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाला ५०-षटकांच्या आणि २०- षटकांच्या दोन्ही स्पर्धांमध्ये विश्वचषक जिंकून देणारी तसेच २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती यशस्वी कर्णधार आहे. त्यामुळे त्यांचाही समावेश करण्यात आला.

‘अदानीं’वरील कर्जभारात २१ टक्के वाढ, आंतरराष्ट्रीय बँकांवर मदारही वाढली

  • अदानी समूहावरील कर्जाचा बोजा मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढला आहे. यात आंतरराष्ट्रीय बँकांच्या कर्जाचे प्रमाण वाढून एक तृतीयांश पातळीवर गेले आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने दिले आहे.
  • समूहाच्या निव्वळ कर्जाचे कंपन्यांच्या एकत्रित व्याज, कर व घसारापूर्व उत्पन्नाशी गुणोत्तर मागील आर्थिक वर्षांत ३.२ टक्के होते. हे प्रमाण सप्टेंबर २०१३ मध्ये नोंदवल्या गेलेल्या ७.६ टक्क्यांच्या तुलनेत लक्षणीय घसरले आहे. अदानी समूहातील प्रमुख सात सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण कर्ज ३१ मार्चअखेर वार्षिक तुलनेत २०.७ टक्क्यांनी वाढून २.३ लाख कोटी रुपयांवर (२८ अब्ज डॉलर) पोहोचले आहे. समूहावरील कर्जाचा बोजा २०१९ पासून सातत्याने वाढत आहे आणि सध्या तो कमी करण्यासाठी समूहाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत. तथापि समूहाची कर्ज परतफेड करण्याची क्षमताही वाढल्याचे ताजी आकडेवारी दर्शविते.
  • अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने वित्तपुरवठा आणि त्याचा स्रोत अर्थात कर्जदाते यात कशा पद्धतीने बदल केला, हे आकडेवारीतून स्पष्ट होते. समूहातील माहितगार सूत्रांनी दिलेली माहिती आणि गुंतवणूकदारांसमोर कंपन्यांनी केलेले सादरीकरण यातून ही मार्च २०२३ अखेरची ही आकडेवारी समोर आली आहे. अदानी समूहावरील कर्जामध्ये आंतरराष्ट्रीय बँकांच्या कर्जाचा वाटा २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, अदानी समूहाच्या कर्जदात्यांच्या यादीत सात वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बँका ही वर्गवारीच नव्हती.

ब्रिटनमध्ये गुजराती लोकप्रतिनिधी गट स्थापण्यास भारतीयांचा विरोध

  • ब्रिटनमधील भारतीय समुदायाच्या अनेक संघटनांनी ब्रिटिश गुजरातींसाठी नवीन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी गट स्थापन करण्यावर आक्षेप घेणारी पत्रे प्रसृत केली आहेत. ‘हे पाऊल विभाजनकारी ठरू शकते,’ असा आक्षेप इतर भारतीय समुदायांनी घेतला आहे.’ ‘ब्रिटिश गुजराती ऑल पार्टी पार्लमेंटरी ग्रुप’ (एपीपीजी) या नावाने या नव्या गटाची नोंदणी करण्यात आली. त्याद्वारे ब्रिटिश गुजराती समुदायाच्या आर्थिक, आरोग्य, सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा ब्रिटिश प्रतिनिधीगृहात मांडल्या जाव्यात. विशेषत: या समुदायासाठी आरोग्य सुविधा,
  • शिक्षण आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल याबाबतचे प्रश्न मांडण्यावर भर देण्यात यावा, या उद्देशाने हा गट स्थापण्यात आला आहे. ब्रिटिश प्रतिनिधीगृहांत अशा लोकप्रतिनिधी गटांना वेगळे स्थान नसते. मात्र हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी तयार केलेले अनौपचारिक गट असतात. विशिष्ट प्रदेश, विशिष्ट धोरणांत समान स्वारस्य असलेली मंडळी यात एकत्र येतात.
  • ब्रिटनमधील ‘फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनल’ने (एफआयएसआय) या नव्या गटाच्या सदस्यांना गेल्या आठवडय़ात पाठवलेल्या पत्रात नमूद केले, की हे पाऊल विभाजनकारी आणि ब्रिटिश भारतीय समुदायाच्या हिताच्या विरुद्ध असल्याचे आमचे मत आहे. असा गट स्थापण्यामागे कोणतेही सयुक्तिक कारण आम्हाला समजू शकलेले नाही. कारण या गटाने उपस्थित केलेल्या चिंता इतर ब्रिटिश भारतीय समुदायाच्या समस्यांपेक्षा वेगळय़ा नाहीत. त्यामुळे सर्व भारतीयांच्या गटाद्वारे ‘एपीजीजी’च्या मागण्या मांडल्या जाऊ शकतात.

मुंबई इंडियन्सची हॅटट्रिक! हैदराबादवर 14 धावांनी रोमांचक विजय

  • राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या २५व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादचा १४ धावांनी पराभव करत विजयाची हॅटट्रिक नोंदवली. हैदराबादसमोर विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ १९.५ षटकांत १७८ धावांत सर्वबाद झाला. हैदराबादला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती, पण अर्जुन तेंडुलकरने केवळ ४ धावा दिल्या. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेटही घेतली. २०व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर त्याने भुवनेश्वर कुमारला कर्णधार रोहित शर्माकरवी झेलबाद केले.
  • हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक ४८ तर हेनरिक क्लासेनने १६ चेंडूत ३६ धावांची स्फोटक खेळी केली. तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने कॅमेरून ग्रीनच्या ६४ आणि इशान किशनच्या ३८ धावांच्या जोरावर ५ गडी गमावून १९२ धावा केल्या.

सनरायझर्स हैदराबादचा डाव –

  • १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. त्यांनी अवघ्या ११ धावांवर पहिली विकेट गमावली. गेल्या सामन्यातील शतकवीर हॅरी ब्रूक ९ धावा करून बाद झाला. बेहरेनडॉर्फने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. लवकरच हैदराबादला आणखी एक धक्का बसला जेव्हा राहुल त्रिपाठी ७ धावा करून बेहरेनडॉर्फच्या चेंडूवर ईशान किशनकरवी झेलबाद झाला.
  • मयंक अग्रवाल आणि मार्कराम यांनी तिसर्‍या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या, परंतु २२ च्या वैयक्तिक धावसंख्येवर तो ग्रीनच्या चेंडूवर हृतिक शोकीनकरवी झेलबाद झाला. अभिषेक शर्माही लगेट १ धावा काढून बाद झाला. परंतु क्लासेन आणि अग्रवाल यांनी ५व्या विकेटसाठी झटपट ५५ धावा जोडून हैदराबादला सामन्यात ठेवले होते. क्लासेनने १६ चेंडूत ३६ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याला पियुष चावलाने बाद केले.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

१९ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.