२० जून चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
२० जून चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |20 June 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२० जून चालू घडामोडी

स्पेनला नेशन्स लीग फुटबॉलचे विजेतेपद

 • स्पेनने अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाला ५-४ अशा फरकाने पराभूत करत नेशन्स लीगचे फुटबॉलचे जेतेपद पटकावले. स्पेनने तब्बल ११ वर्षांनी कुठल्याही स्पर्धेचे जेतेपद मिळवले. तर, क्रोएशियाचा अनुभवी कर्णधार लुका मॉड्रिचच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय किताबाची प्रतीक्षा अजूनही सुरूच आहे.
 • निर्धारित आणि अतिरिक्त वेळेतही सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर झालेल्या शूटआऊटमध्ये स्पेनचा गोलरक्षक उनाइ सिमॉनने क्रोएशियाच्या दोन पेनल्टी रोखत संघाचा विजय सुनिश्चित केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये जेव्हा लढत ३-३ अशा बरोबरीत होती. तेव्हा सिमॉनने लोवरो मायेरची पेनल्टी रोखली. यानंतर मार्कस असेनिओने गोल करत स्पेनला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. क्रोएशियाच्या इवान पेरिसिचने गोल करत सामना पुन्हा ४-४ असा बरोबरीत आणला. यानंतर सायमनने ब्रूनो पेटकोव्हिचची पेनल्टी रोखत क्रोएशियावर दबाव वाढवला. यानंतर डॅनी कार्वाहालने पेनल्टीवर गोल करत स्पेनचा विजय निश्चित केला.
 • स्पेनने यापूर्वी २०१० विश्वचषक फुटबॉलचे जेतेपद मिळवले आहेत. तर, १९६४, २००८ आणि २०१२ मध्ये त्यांनी युरोपियन अजिंक्यपद स्पधेचे अजिंक्यपद पटकावले आहे.

‘इंडिगो’चे ५०० विमानखरेदीचे उड्डाण, फ्रान्सच्या ‘एअरबस’शी करार

 • ‘इंडिगो’ या हवाई प्रवास वाहतूक कंपनीने सोमवारी ‘पॅरिस एअर शो’मध्ये ‘एअरबस’ या कंपनीकडे ‘ए३२०’ श्रेणीतल्या ५०० छोटय़ा विमानांची मागणी नोंदवली. ‘एअरबस’ या फ्रान्सच्या कंपनीकडे एवढी मोठी मागणी नोंदवणारी ‘इंडिगो’ ही पहिली कंपनी असल्याचे बोलले जाते.
 • भारतीय विमान वाहतुकीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे, अशी भावना ‘इंडिगो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी व्यक्त केली. इंडिगोच्या मागणीत ‘ए३२०एनईओ’, ‘ए३२१एनईओ’ आणि ‘ए३२१एक्सएलआर’ या विमानांचा समावेश आहे. या मागणीचे आर्थिक तपशील मात्र ‘इंडिगो’ने जाहीर केले नाहीत.
 • ‘पॅरिस एअर शो’मध्ये ‘इंडिगो’ आणि ‘एअरबस’ यांच्यात विमान खरेदी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. वाजवी दरात सेवा पुरवणाऱ्या ‘इंडिगो’ने १६ वर्षांपूर्वी प्रवासी वाहतूक सुरू केली होती. इंडिगोच्या यापूर्वीच्या ४८० विमानांच्या मागणीची अद्याप पूर्तता झालेली नाही. वर्षांच्या सुरुवातीला टाटा समूहाच्या मालकीच्या ‘एअर इंडिया’ने ‘एअरबस’ आणि ‘बोइंग’कडे ४७० विमानांची मागणी नोंदवली होती.

IPS रवि सिन्हा होणार ‘रॉ’ चे नवे प्रमुख, मोदी सरकारचा निर्णय

 • IPS अधिकारी रवि सिन्हा यांना आता रॉ चे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. रवि सिन्हा हे छत्तीसगढ कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. रवि सिन्हा आत्तापर्यंत कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव या पदावर कार्यरत होते. ते आता रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख असतील. काही वेळापूर्वीच ही घोषणा करण्यात आली. सध्याच्या रॉ चीफ सामंत गोयल यांची जागा ते घेतील. सामंत गोयल हे ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर रवि सिन्हा या पदावर बसतील आणि पुढची दोन वर्षे रॉचे प्रमुख म्हणून काम करतील.
 • चीन आणि भारत यांच्यात काहीसं तणावाचं वातावरण असताना अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही रवि सिन्हा यांना देण्यात आली आहे. गुप्त माहिती आधुनिक तंत्राच्या मदतीने काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. रवि सिन्हा हे सध्या कॅबिनेट सचिवालयात विशेष पदावर कार्यरत आहेत. कॅबिनेटने त्यांच्यावर आता नवी जबाबदारी सोपवली आहे. १ जुलैपासून रवि सिन्हा पुढची दोन वर्षे रॉ या भारताच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून कार्यरत असतील.
 • रवि सिन्हा हे छत्तीसगढ कॅडरचे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रवि सिन्हा हे रॉच्या ऑपरेशनल डिव्हिजनचे प्रमुख म्हणूनही काम करत आहेत. माहिती आणि गुप्त माहिती गोळा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. आधुनिक पद्धतीने ती गोळा करणं हे त्यांचं वैशिष्ट्य समजलं जातं.
 • रवि सिन्हा हे लो प्रोफाईल राहून माहिती काढण्याचं त्यांचं कौशल्य पणाला लावतात. गुप्तचर विभागात त्यांची ओळख व्यापक आहे. काश्मीर, पूर्वोत्तर भाग आणि दहशतवाद्यांचं क्षेत्र यातली माहिती मिळवण्यात, तिथे काय काय चाललं आहे हे समजून घेण्यात तिथल्या घटनाक्रमांचा अर्थ लावण्यात ते माहीर आहेत.

नेपाळमध्ये ‘आदिपुरुष’सह सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी

 • ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील संवादांमुळे वाद निर्माण झाल्यामुळे, या चित्रपटासह सर्व हिंदी चित्रपटांवर नेपाळमध्ये सोमवारी बंदी घालण्यात आली. सीतेचा उल्लेख ‘भारताची कन्या’ असा करण्यात आल्याबाबत नेपाळला आक्षेप आहे.
 • रामायण या महाकाव्याचे कथात्मक रूपांतर असलेल्या या चित्रपटावर काठमांडू व पोखरामध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर, त्याचे देशभरातील प्रदर्शन थांबवण्यात आले असल्याचे वृत्तांमध्ये म्हटले आहे. कुठलाही हिंदी चित्रपट प्रदर्शित केला जाणार नाही हे निश्चित करण्यासाठी काठमांडूतील १७ चित्रपटगृहांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
 • सीतेचा जन्म दक्षिण नेपाळमधील जनकपूरमध्ये झाला, अशी मान्यता आहे.

ब्लिंकन-जिनपिंग भेटीत काही मुद्दय़ांवर मतैक्य

 • चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली. ब्लिंकन यांच्या चीन दौऱ्याचा हा दुसरा दिवस होता. यावेळी झालेल्या विस्तृत चर्चेमध्ये दोन्ही देशांची काही विशिष्ट मुद्दय़ांदरम्यान एकमत झाल्याचे या भेटीनंतर सांगण्यात आले. मात्र, याबाबतचे अधिक तपशील दिले गेले नाहीत.
 • गेल्या पाच वर्षांमध्ये चीनला भेट देणारे ते अमेरिकेचे पहिलेच परराष्ट्रमंत्री आहेत. अमेरिकेने चीनचे हेरगिरी बलून पाडल्यापासून दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला होता.अमेरिकेने चीनवर लादलेले एकतर्फी निर्बंध उठवावेत, चीनच्या तंत्रज्ञानात्म विकासात अडथळे आणणे थांबवावे आणि चीनच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करू नये असे, आवाहन चीनच्या राजनैतिक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.चीनचे परराष्ट्र खात्याचे संचालक वांग यी आणि परराष्ट्रमंत्री चीन गांग यांनी ब्लिंकन यांच्याबरोबर मोकळेपणाने आणि सखोल चर्चा झाल्याचे क्षी जिनिपग यांनी सांगितले.
 • ब्लिंकन यांच्याशी झालेल्या चर्चादरम्यान त्यांच्यासमोर चीनची बाजू स्पष्ट करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि आपल्यादरम्यान बाली येथे झालेली सामायिक सहमती कायम ठेवली जाईल, तसेच दोन्ही देशांनी प्रगती केली आहे आणि काही विशिष्ट मुद्दय़ांवर एकमत झाले असेही जिनपिंग यांनी सरकारी वृत्तसंस्थेला सांगितले.
 • जिनपिंग यांची भेट घेण्यापूर्वी ब्लिंकन यांनी परराष्ट्र खात्याचे संचालक वांग यी यांचीही भेट घेतली. दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे वांग यांनी ब्लिंकन यांना सांगितले. तसेच अमेरिकेने चीनला वर्चस्ववादी समजू नये आणि पारंपरिक पाश्चिमात्त्य समजुतींच्या आधारे चीनविषयी गैरसमज करून घेऊ नयेत अशी विनंतीही वांग यांनी केली.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

२० जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.