Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |27 July 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२७ जुलै चालू घडामोडी
विजयी सलामीचे भारताचे ध्येय; भारत-विंडीज पहिला एकदिवसीय सामना आज
- वेस्ट इंडिजविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल, तर यष्टीरक्षकाच्या स्थानासाठी इशान किशन आणि संजू सॅमसन यांमध्ये चुरस पहायला मिळेल.भारतीय संघ आशिया चषक आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी या मालिकेच्या माध्यमातून खेळाडूंचे योग्य संयोजन बसवण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही कसोटी सामन्यांप्रमाणेच भारताचे पारडे एकदिवसीय मालिकेतही जड राहणे अपेक्षित आहे. मात्र, मालिकेत सूर्यकुमार, इशान, सॅमसन, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिकसारख्या खेळाडूंवर विशेष लक्ष राहणार आहे.
- ट्वेन्टी-२० प्रारूपातील आपली लय एकदिवसीय सामन्यांमध्ये कायम राखण्यात अपयशी ठरलेल्या सूर्यकुमारचा प्रयत्न जायबंदी श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत चौथ्या स्थानावर आपली दावेदारी भक्कम करण्याचा राहील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलग तीन सामन्यांत पहिल्या चेंडूवर बाद झालेल्या सूर्यकुमारला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
- केएल राहुलच्या अनुपस्थितीत इशान आणि सॅमसनकडे यांच्याकडे दुसऱ्या यष्टीरक्षकाच्या जागेसाठी स्थान मजबूत करण्याची संधी आहे. तसेच, विश्वचषक स्पर्धेपूर्वी राहुल पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता कमीच आहे. या वेळी अधिक संधी मिळण्याची अपेक्षा सॅमसनला असेल. कसोटी मालिकेत चमक दाखवणाऱ्या इशानला पहिल्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मध्यक्रमासाठी सॅमसन व सूर्यकुमार यांमध्ये चुरस पाहायला मिळेल.
मुंबई विद्यापीठानं आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या; नव्या तारखेबाबत दिली ‘ही’ माहिती!
- गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह काही भागात हवामान विभागाकडून रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- काही भागांत सरकारी विभागांना व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून सर्व संलग्न विद्यापीठे व विद्यार्थ्यांच्या आज २७ जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
रेल्वे स्थानकाचे रुप पालटणार! काय आहे अमृत भारत योजना?
- रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत देशभरातील एक हजार ३०९ स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. यात पुण्यासह लोणावळा, दौंड, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि इतर स्थानकांचा समावेश आहे.
- केंद्र सरकारने अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत देशभरात एक हजार ३०९ स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यात पुण्यासह अकोला, भुसावळ, चंद्रपूर, कोल्हापूर, दादर, गुलबर्गा, जळगाव, कल्याण, कुर्ला, मलकापूर, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर, नाशिक रोड, सोलापूर, ठाणे, वर्धा, लोणावळा, मनमाड, अमरावती, मिरज, अहमदनगर, माथेरान, चाळीसगाव, देवळाली, शेगाव, कराड, सांगली, दादर, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, धरणगाव या स्थानकांचा समावेश आहे.
कशा पद्धतीने होणार विकास?
- स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा
- स्थानक परिसराचे सुशोभीकरण
- स्थानक प्रवेशद्वारांचा विकास
- स्थानकावर प्रतीक्षागृहांची उभारणी
- स्वयंचलित जिन्यांची उभारणी
- स्थानकातील अंतर्गत रचनेत सुधारणा
- स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा
- एक देश, उत्पादन योजनेंतर्गत विक्री केंद्र
- मोफत वाय-फाय किऑस्क
शाळांमध्ये स्मार्टफोन बंदी आणाच, युनेस्कोची शिफारस; ‘डिजिटल क्रांती’बाबत व्यक्त केली चिंता!
- कोविड २०१९ नंतर अनेक क्षेत्रात महत्त्वाचे बदल झाले आहेत. या काळात ऑनलाईन जगण्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. शिक्षण क्षेत्रातही डिजिटल क्रांती घडून आली. परंतु, शिक्षण क्षेत्रातील ही डिजिटल क्रांती विद्यार्थ्यांसाठी चिंताजनक असल्याचं मत युनेस्कोच्या अहवालातून नोंदवण्यात आलं आहे. अभ्यासातील व्यत्यय टाळणे, शिकण्यात सुधारणा करण्यासाठी आणि मुलांचे साबयर बुलिंगपासून संरक्षण करण्याकरता शाळांमध्ये स्मार्टफोनमध्ये बंदी घालावी, अशी शिफारस यूनेस्कोने (The United Nations Educational, Scientific and Cultural Organization) त्यांच्या अहवालातून केली आहे. दि गार्डियन या वृत्तसंकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
- “मोबाईलचा अतिरिक्त वापर झाल्याने शैक्षणिक कामगिरी मंदावते. स्क्रीन टाईम वाढल्याने मुलांच्या भावनिक स्थिरतेवर नकारात्मक परिणाम होतो. परिणामी मुलं चिडचिडी आणि रागिट बनतात”, असंही युनस्कोने म्हटलं आहे. अनेक शाळांमधून आज ऑनलाईन शिक्षण दिलं जातं. अनेक विद्यापीठातही ऑनलाईन शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. मात्र, या सोयीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याकडे युनेस्कोने लक्ष वेधले आहे. “विकासाच्या दृष्टीने केलेले नवे प्रयोग चांगलेच असतात असं नाही. प्रत्येक बदलाने प्रगतीच साधली जाते असे नाही. काहीतरी नवे करणे गरजेचे असले तरी ते केलेच पाहिजे असे नाही”, असा निष्कर्षही युनेस्काने काढला आहे.
शिक्षक प्रथम असले पाहिजेत
- “ऑनलाईन शिक्षण देताना शिक्षणाच्या सामाजिक परिणामांकडे दुर्लक्ष करून नये”, असे आवाहनही करण्यात आले आहे. “डिजिटल क्रांतीमध्ये अतुलनीय क्षमता आहे. परंतु, समाजात त्याचे नियमन केले जात नाही. तसंच, शिक्षणक्षेत्रात या डिजिटल क्रांतीचा कसा वापर केला जातोय, याकडे लक्ष देणे गरजेचं आहे”, असं युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझौले म्हणाल्या. “शिक्षणातील डिजिटल क्रांती ही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झाली पाहिजे. हा बदल विद्यार्थ्यांसाठी धोका ठरू नये. विद्यार्थ्यांच्या गरजा प्रथम ठेवा. ऑनलाईन सुविधा हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादासाठी पर्याय असू नये. शिक्षक प्रथम असले पाहिजेत”, असंही त्या पुढे म्हणाल्या.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२७ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २६ जुलै २०२३ चालू घडामोडी
- २५ जुलै २०२३ चालू घडामोडी
- २४ जुलै २०२३ चालू घडामोडी
- २३ जुलै २०२३ चालू घडामोडी
- २२ जुलै २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |