Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |26 July 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
२६ जुलै चालू घडामोडी
Income Tax: Phone Pe च्या मदतीने भरता येणार इन्कम टॅक्स, लॉन्च केले ‘हे’ फिचर
- तुम्ही अद्याप तुमचे रिटर्न भरले नसेल, तर ते लवकरच भरा. कारण आयटीआर भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. प्रत्येक वर्षातील हा काळ असा असतो की जेव्हा सर्व करदाते आपले आयटीआर रिटर्न्स (ITR) भरण्यासाठी त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचे आणि पैशांचे मूल्यांकन करण्यात व्यस्त असतात. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठी ITR भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै आहे. ३१ जुलैच्या पुढे ही मुदत वाढवली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. टॅक्स भरण्यासाठी भारतीय डिजिटल पेमेंट कंपनी Phone Pe ने त्यांच्या App वर ‘Income Tax Payment’ हे फिचर लॉन्च केले आहे.
- फोन पे ने लॉन्च केलेले हे फिचर करदात्यांना आणि व्यावसायिकांना थेट फोन पे मधून self-assessment आणि अॅडव्हान्स टॅक्स भरता येणार आहे. फोन पे ने सांगितल्याप्रमाणे या फीचरमुळे करदात्यांना सोपे होणार आहे. यामुळे टॅक्स पोर्टलवर लॉग इन करण्याची गरज निर्माण होणार नाही. हे फिचर अधिक सक्षम करण्यासाठी फोन पे ने PayMate, डिजिटल B2B पेमेंट आणि सेवा प्रदाता सह भागीदारी केली आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
- फोन पे ने सोमवारी आपले नवीन फिचर लॉन्च केले. ज्यामुळे वापरकर्ता आपल्या क्रेडिट कार्ड किंवा UPI चा वापर करून सोप्या पद्धतीने आपला टॅक्स भरू शकतात. ही सुविधा क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी अतिरिक्त फायद्यांसह येते. कारण यामध्ये वापरकर्ते ४५ दिवसांच्या व्याज मुक्त कालावधीचा आनंद घेऊ शकतात. तसेच त्यांच्या संबंधित बँकाच्या आधारे त्यांच्या कर पेमेंटवर रिवॉर्ड पॉईंट देखील मिळवू शकतात.
- महत्वाची गोष्ट म्हणजे फोन पे च्या फीचरद्वारे करदाते फक्त कर भरू शकतात. मात्र ते फाईल करू शकत नाहीत. त्यामुळे आयटीआर फाईल करण्यासाठी वापरकर्त्यांना दिलेल्या तपशिलाचे पालन करावे लागेल.
Money Mantra: मोबाईल बँकिंग आणि UPIचे फायदे
- एके काळी मोबाइल लॉंच करताना रिलायन्सच्या अंबानींनी एक नारा दिला होता … कर लो दुनिया मुठ्ठीमे…. आणि आज मोबाईल बँकिंग आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मुळे तो नारा सत्यात उतरला आहे.
- मोबाईल बँकिंग ही एक आर्थिक सेवा आहे ज्याद्वारे ग्राहक त्यांच्या मोबाईल उपकरणांद्वारे सहजपणे बँकिंग संबंधित व्यवहार करू शकतात. ही एक आधुनिक तांत्रिक सुविधा आहे जी लोकांना बँक खात्याशी संबंधित सेवांचा लाभ अतिशय सुलभतेने घेण्यास मदत करते. ही सेवा वापरण्यासाठी, ग्राहकांना त्यांच्या बँकेचे मोबाईल बँकिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यांचे बँक खाते नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. त्यानंतर, ते त्यांचे वापरकर्तानाव आणि पासवर्डसह लॉग इन करू शकतात आणि मोबाइल बँकिंगचा वापर करु शकतात.
मोबाइल बँकिंगद्वारे काय काय करता येतं?
- खाते माहिती केव्हाही मिळवणे : ग्राहक त्यांचे खाते तपशील, शिल्लक, व्यवहार इतिहास इत्यादी त्यांच्या मोबाईल बँकिंग द्वारे तपासू शकतात.
- आर्थिक व्यवहार: ग्राहक मोबाईलद्वारे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करू शकतात आणि खात्यातून काढू पण शकतात, वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवू शकतात, चेक / डीडी पाठवण्याची ऑर्डर देऊ शकतात.
- चलन योजना पेमेंट: ग्राहक त्यांचे वीज बिल, गॅस बिल, मोबाईल बिल किंवा इतर उपलब्ध सेवा यांची चलने मोबाईल बँकिंग द्वारे भरू शकतात.
Money Mantra: ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स-भविष्यातील प्रगतीचे इंजिन
- आजच्या या लेखातून नव्या भारताच्या निर्मितीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या एका क्षेत्राचा आढावा घेऊया. जसजशी व्यापार, उद्योग, व्यवसाय यांची पुरवठा साखळी बदलते आहे म्हणजेच भारताचा या पुरवठा साखळीतील महत्त्वाचा दुवा म्हणून विचार होताना दिसत आहे. अशावेळी ‘ट्रान्सपोर्टेशन आणि लॉजिस्टिक्स’ या क्षेत्राचे भविष्य उजळणार आहे यात शंकाच नाही.
- पूर्वीच्या काळापासून रेल्वे आणि रेल्वेचे सुटे भाग बनवणाऱ्या निवडक कंपन्या एवढाच काय तो या क्षेत्रातील कंपन्यांचा शेअर बाजारात बोलबाला असायचा. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. अवजड वाहतुकीसाठी आवश्यक असणारी वाहने, ट्रक, ट्रेलर्स, जहाज, टँकर, जहाजाचे सुटे भाग बनवणाऱ्या, कंपन्या बंदरात माल उतरल्यानंतर विविध ठिकाणी नेण्यासाठी २४ तास कार्यरत असलेली पुरवठा साखळी; अर्थातच त्यातील महत्त्वाचा भाग भारतीय रेल्वे, अलीकडील काळात प्रवासी विमान वाहतुकीचे वाढलेले क्षेत्र, ई-कॉमर्स, कार्गो सेवा, बंदर आणि रेल्वे यांना जोडणाऱ्या मालवाहू रेल्वे गाड्यांतील माल ठेवण्यासाठी असलेली वेअर हाऊस म्हणजेच विशाल गोदामे एवढा मोठा व्यवसाय या क्षेत्रात सामावलेला आहे.
जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांत, प्रणॉय उप-उपांत्यपूर्व फेरीत
- भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) पहिल्या फेरीचा अडथळा पार केला. महिला एकेरीत आकर्षी कश्यपला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.पुरुष एकेरीत श्रीकांतने चायनीज तैपईच्या चोऊ तिएन शेनचे आव्हान २१-१३, २१-१३ असे सहज संपुष्टात आणले.
- आठव्या मानांकित प्रणॉयने देखील पहिल्या फेरीचा अडथळा सहज पार करताना चीनच्या ली शी फेंगचे आव्हान २१-१७, २१-१३ असे परतवून लावले. यंदाच्या हंगामात श्रीकांत, प्रणॉय यांचा प्रवास अडखळत सुरू होता. प्रणॉयने एक विजेतेपद मिळवले आहे.
- श्रीकांतला मात्र अभावानेच बाद फेरीपुढे जाण्यात यश आले आहे. आता श्रीकांत, प्रणॉय यांच्यातच उप-उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे.महिला एकेरीत आकर्षीला अनुभवी अकाने यामागुचीचे आव्हान पेलवले नाही. यामागुचीने २१-१७, २१-१७ असा विजय मिळवला. महिला दुहेरीत मात्र ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद जोडीने जपानच्या सायाका होबारा-सुईझु जोडीवर ११-२१, २१-१५, २१-१४ असा विजय मिळवला.
रशियात लिंगबदल शस्त्रक्रिया, ट्रान्सजेंडर विवाहांवर बंदी, संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून कायदा संमत
- रशियामध्ये लिंगबदल शस्त्रक्रियांवर बंदी घालणाऱ्या कायद्यावर अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वाक्षरी केली आहे. या कायद्यामुळे आता रशियात कोणतीही व्यक्ती लिंग बदलण्याच्या उद्देशाने कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करू शकणार नाही. अध्यक्ष पुतिन यांचा हा निर्णय रशियातील एलजीबीटीक्यू+ समुदायासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. दी गार्डियनच्या रिपोर्टनुसार रशियातील संसदेच्या दोन्ही सभागृहांनी सर्वानुमते हा अधिनियम पारित केला आहे.
- या नव्या कायद्यामुळे आता रशियात कुठलीही व्यक्ती लिंगबदलाची शस्त्रक्रिया करू शकणार नाही. तसेच ज्या जोडप्यांनी लिंग बदलून लग्नं केली आहेत, ती लग्नंदेखील आता रद्द होतील. यासह ट्रान्सजेंडर पालक मुलं दत्तक घेऊ शकणार नाहीत.
- लिंगबदलाबाबत रशियात आता कडक कायदा केला असला तरी यात एक अपवाद आहे. ज्या मुलांमध्ये लिंगाबाबत जन्मजात विसंगती आढळेल, किंवा ज्या अर्भकांना काही वैद्यकीय उपचारांची गरज असेल अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेस परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, रशियन सरकारच्या या नव्या कायद्याचा बचाव करताना संसदेने म्हटलं आहे की, कुटुंबांबत पाश्चिमात्य विचारसरणीच्या विरोधात हे रशियाचं योग्य पाऊल आहे. बऱ्याचदा समाजाला अशा प्रकारच्या उपायांना सामोरं जावं लागतं. ही काही त्याची पहिली वेळ नाही.
- हा कायदा जरी आज पारित झाला असला तरी याची सुरुवात एक दशकापूर्वी झाली होती. दशकभरापूर्वी रशियन पुराणमतवादी चर्चने पारंपरिक कौटुबिक मुल्यांवर लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून या प्रकरणाला सुरुवात झाली होती.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
२६ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- २५ जुलै २०२३ चालू घडामोडी
- २४ जुलै २०२३ चालू घडामोडी
- २३ जुलै २०२३ चालू घडामोडी
- २२ जुलै २०२३ चालू घडामोडी
- २१ जुलै २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |