Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |6 November 2023
Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam
RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.
६ नोव्हेंबर चालू घडामोडी
‘बर्थडे बॉय’ विराट कोहली ठरला शतकाधीश! ४९व्या वनडे शतकासह सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी
- आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ३७व्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. दोन्ही संघातील हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक प्रथम फलंदाजी निर्णय घेतला होता. विराट कोहलीने या सामन्यात आपले ४९ वनडे शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबर केली. विराटने हे शतक ११९ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. त्याचबरोबर भारतीय संघाने ५० षटकांत ५ बाद ३२६ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले.
- विराट कोहलीने ११९ चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४९ वे शतक होते. या बाबतीत त्याने महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने वनडेमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. सचिनने ४५२ एकदिवसीय डावात ही कामगिरी केली होती, तर विराट कोहलीने २७७ व्या एकदिवसीय डावात ४९ शतके झळकावली आहेत. यात विशेष म्हणजे आज वाढदिवसाच्या दिवशी त्याने शतक झळकावून विक्रमाची बरोबरी केली. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे शतक ठरले.
वाढदिवशी वनडेत शतक झळकावणारा विराट सातवा फलंदाज ठरला –
- या विश्वचषकात आतापर्यंत विराटने नाबाद १०१, ८५ धावा, नाबाद ५५, १६ धावा, नाबाद १०३, ९५ धावा, शून्य आणि ८८ धावा अशा खेळी केल्या आहेत. आज शतक झळकावत विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या वाढदिवशी शतक ठोकणारा सातवा खेळाडू ठरला आहे. टॉम लॅथम, रॉस टेलर, सनथ जयसूर्या, मिचेल मार्श, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे.
वाढदिवशी वनडेत शतक झळकावणारे फलंदाज –
- टॉम लॅथम -१४०* विरुद्ध नेदरलँड्स ०२/०४/२०२२
- रॉस टेलर -१३१* विरुद्ध पाकिस्तान ०८/०३/२०१११
- सनथ जयसूर्या -१३० विरुद्ध बांगलादेश ३०/०६/२००८
- मिचेल मार्श -१२१ विरुद्ध पाकिस्तान २०/१०/२०२३
- सचिन तेंडुलकर -१३४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया २४/०४/१९९८
- विनोद कांबळी -१००* विरुद्ध इंग्लंड १८/०१/१९९३
- विराट कोहली – १०१* विरुद्ध दक्षिण आफ्रिका ०५/११/ २०२३
वनडेत सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज –
- ४९ विराट कोहली (२७७ डाव)
- ४९ सचिन तेंडुलकर (४५२ डाव)
- ३१ रोहित शर्मा (२५१ डाव)
- ३० रिकी पाँटिंग (३६५ डाव)
- २८ सनथ जयसूर्या (४३३ डाव)
किंग कोहलीच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याचे कार कलेक्शन
- विराट कोहली या क्षणी नक्कीच जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. कोहली सध्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये सात डावात 442 धावा करून आपला दर्जा दाखवत आहे. भारताचा माजी कर्णधार आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट कोहलीला त्याच्या चाहत्यांमध्ये किंग कोहली म्हणूनही ओळखले जाते, जो क्रिकेटच्या बाबतीतच नाही तर कारच्या बाबतीतही किंगपेक्षा कमी नाही. आज आपण विराट कोहलीच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊया.
लॅम्बोर्गिनी हुराकन –
- विराट कोहलीकडे यापूर्वी काही लॅम्बोर्गिनी आहेत. त्याच्या सध्याच्या कार कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनी हुराकन आहेस जे आयकॉनिक सिझर डोअर्स आणि त्याच्या हुडखाली असलेल्या शक्तिशाली V10 इंजिनसाठी ओळखले जाते. ही स्पोर्ट्स कार 3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. त्याची किंमत 3.22 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे.
ऑडी A8L QW12 Quattro –
- विराट कोहली हा ऑडी इंडियाचा अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळे त्याच्या गॅरेजमध्ये कोणत्याही वेळी अनेक ऑडी मिळू शकतात. त्याच्याकडे A8L ही A8 ची लाँग-व्हीलबेस आवृत्ती आणि 6.3 लिटर इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 494 hp आणि 625 Nm टॉर्क निर्माण करते. या कारची किंमत 1.98 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे.
ऑडी R8 V10 –
- विराट कोहलीकडे पिवळ्या रंगाची R8 V10 कार देखील आहे, जी 5.2 लिटर V10 इंजिनद्वारे समर्थित आहे, जी 530 Nm पीक टॉर्क आणि 517 hp पॉवर जनरेट करते, क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह 7-स्पीड ट्विन क्लच DSG ऑटोमॅटिकशी जोडलेला आहे. ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारची किंमत 2 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे.
ऑडी R8 LMX लिमिटेड संस्करण –
- किंग कोहलीच्या गॅरेजमधील इतर R8 हे मर्यादित संस्करण R8 LMX आहे, जे 5.2 लिटर V10 इंजिनसह येते, परंतु 570 hp पॉवर आणि 540 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यासाठी ट्यून केलेले आहे. त्याची किंमत 2.97 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे.
बेंटले कॉन्टिनेंटल जीटी मुलिनर –
- भारताच्या माजी कर्णधारालाही बेंटली आवडते आणि त्यांच्यापैकी काही त्याच्याकडे आहेत. कॉन्टिनेंटल जीटी मुलिनर आहे ज्याची किंमत 4.04 कोटी रुपयांपेक्षा जास्त (एक्स-शोरूम) आहे. ही कार देखील कोहलीच्या कार कलेक्शनमधील सर्वात महागडी कार आहे. नवीन मॉडेलमध्ये 22-इंच चाकांसाठी नवीन मुलिनर डिझाइनसह दुहेरी डायमंड फ्रंट ग्रिल आहे.
बेंटले फ्लाइंग स्पर –
- कोहलीच्या गॅरेजमध्ये आणखी एक बेंटले फ्लाइंग स्पर आहे. सुपरकारला 6.0 लिटर टर्बोचार्ज्ड W12 इंजिन मिळते. जे 626 bhp आणि 900 Nm टॉर्क निर्माण करते. 8-स्पीड ड्युअल-क्लच गिअरबॉक्सद्वारे चाकांना वीज वितरित केली जाते. त्याची किंमत सुमारे 3.41 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे.
मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांचा विषय पेटणार
- राज्यभरात मराठा समाजातील कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी नोंद असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास पुढील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. यामुळेच मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा विषय तापण्याची चिन्हे आहेत.
- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, यासाठी उपोषण आंदोलन सुरू केले होते. ज्यांच्या पूर्वजांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांनी पुरावे सादर केल्यावर कुणबी दाखले देण्याचा सरकारचा निर्णय जुनाच आहे. मात्र मराठवाड्यात जुन्या नोंदी उपलब्ध नसल्याची तक्रार होती. त्यामुळे आणखी कोणते दस्तावेज पुराव्यादाखल वापरता येतील व त्याची कार्यपद्धती काय राहील, याबाबत राज्य सरकारला अहवाल देण्यासाठी सरकारने माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. समितीने पावणेदोन कोटी नोंदी तपासून सुमारे १४ हजारांहून अधिक नोंदी शोधल्या आहेत.
- मराठा समाजाला राज्यभरात कुणबी प्रमाणपत्रे दिली जावीत, अशी जरांगे यांची मागणी असल्याने सरकारने शिंदे समितीची कार्यकक्षा राज्यभरात वाढविण्याबाबतचा शासननिर्णय दोन दिवसांपूर्वी जारी केला आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. आरक्षण विरोधी मंच आणि काही ओबीसी संघटनांकडून यासंदर्भात याचिका सादर करण्याची तयारी सुरू आहे.
- समाजाला शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणासाठी आरक्षण द्यायचे असेल, तर ते पूर्ण राज्यभरात असू शकत नाही. कोळी समाजात जसे अनेक प्रकार आहेत, मुंबई, पालघर, ठाणे व कोकणातील कोळी वेगवेगळे आहेत, पालघरमधील कोळी अनुसूचित जमातीतील आहेत. त्याचप्रमाणे कुणबींमध्येही ४६ प्रकार आहेत. विदर्भ, कोकण, उत्तर महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या भागांतील कुणबी वेगवेगळे असून त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाहीत. सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हे ठराविक क्षेत्रापुरते मर्यादित असते. एखाद्या तालुक्यापुरतेही मर्यादित असू शकते. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट राज्यभरात कुणबी दाखले देण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा मुद्दा न्यायालयात मांडला जाणार असल्याचे सदावर्ते यांनी स्पष्ट केले.
आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांचे अखेर आदेश, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल
- १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू झाल्या. यावेळी ४८० च्या जवळपास बदल्या झाल्याचा दावा करण्यात आला. परंतु, आदेश निघालेच नव्हते. ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर ३ नोव्हेंबरला काही अधिकाऱ्यांचे बदली आदेश काढण्यात आले.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ ऑक्टोबरला याबाबतचे संकेत दिले होते. त्यानुसार, ३ नोव्हेंबरला एकाचवेळी राज्यातील १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदलीचे आदेश निघणे अपेक्षित होते. परंतु केवळ ३० आदेश निघाल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, तांत्रिक अडचण आल्याचे सांगत लवकरच सगळेच आदेश अपलोड होणार अशी माहिती परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. परंतु, शेवटच्या क्षणी बदली आदेशात काही बदल होण्याची शक्यता नकारता येत नसल्याची चर्चा आहे. परिवहन खात्यातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर बऱ्याच अधिकाऱ्यांचे बदली आदेश निघाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
देवाण-घेवाणीचे आरोप
- परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मोठी देवाण-घेवाणीचे आरोप झाले होते. हा प्रकार थांबवण्यासाठी परिवहन खात्याने नवीन संगणकीय प्रणाली विकसित केली. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांनी १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदलीची अंतिम यादी काढल्याचा दावा केला गेला. परंतु आदेश निघालेच नव्हते.
गुजरात-महाराष्ट्रात क्रिकेट सट्टेबाजीसाठी ‘अॅप’चा सर्वाधिक वापर
- भारतात क्रिकेटवर सर्वाधिक सट्टेबाजी होते. सट्टेबाजीसाठी १०० पेक्षा जास्त बेटिंग अॅप असून यातून महाराष्ट्र सायबर पोलिसांना सट्टेबाजीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचे स्पष्ट होते. गुजरात, महाराष्ट्, गोवा आणि दिल्लीत अॅपवरून सर्वाधिक सट्टेबाजी होत असल्याची माहिती राज्य सायबर पोलीस विभागाच्या नोंदीतून समोर आली आहे.
- सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. क्रिकेट सट्टेबाजीमध्ये हजारो कोटींची उलाढाल असल्यामुळे तरुण-तरुणींसह मोठमोठे व्यापारी जुगारात गुंतले आहेत. ऑनलाईन, लिंक किंवा अॅपच्या माध्यमातून क्रिकेट सट्टेबाजीचे वाढते प्रमाण पाहता माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने जुलै महिन्यात १३८ क्रिकेट अॅपवर बंदी घातली. त्यामध्ये वनएक्स बेट, लोटस ३६५, फेअरीप्ले, परीमॅच, दफा बेट, बेट वे सट्टा, राजा बेट, बेट विनर, मेल बेट अशा बेटिंग अॅपचा समावेश आहे. परंतु, बंदी घातलेल्या अॅपच्या संचालकांनी अन्य नावाने अँप तयार केले. क्रिकेट सट्टेबाजीच्या बनावट लिंक पसरवण्यामध्ये छत्तीसगड, झारखंड आणि राजस्थानातील सायबर गुन्हेगार पहिल्या स्थानावर असल्याची माहितीही पोलिसांच्या नोंदीतून समोर आली आहे.
हवाला रॅकेटच्या माध्यमातून ‘चुकारा’
- सट्टेबाजीचे सूत्रधार चीन, फिलीपाईन्स, व्हियतनाम, रशिया, नायजेरिया आणि दुबईत असतात. दुबईतूनच सट्टेबाजीचे दर कमी-जास्त होत असतात. लहान सट्टेबाज बेटिंग लाईनवरून खायवाडी-लगवाडी करून दुबईतील सूत्रधारांच्या बुकवर रक्कम वळती करतात. त्यामुळे भारतात पैशांचा ‘चुकारा’ हवाला रॅकेटच्या माध्यमातून केला जातो.
महादेव आणि डायमंड अॅपचा बोलबाला
- छत्तीसगडमधील सौरव चंद्राकार आणि रवी उप्पल यांच्या महादेव क्रिकेट अॅपमुळे पहिल्यांदाच हजारो कोटींची उलाढालीचा लेखा-जोखा उघडकीस आला. महादेव अॅपचे सर्वाधिक वापरकर्ता महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या राज्यात असून मोठमोठे राजकीय पुढारी, सिनेतारका, अभिनेते या अॅपशी जुळले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्य अॅपच्या तुलनेत महादेव आणि सोंटू जैनचा डायमंड एक्स्चेंज अॅपचा देशभरात सर्वाधिक वापर होत असल्याची माहिती पोलिसांच्या अभिलेखावर आहे.
- क्रिकेटवर सट्टेबाजी अवैध आहे. नागरिकांना फसविण्यासाठी सायबर गुन्हेगारच बनावट लिंक किंवा बनावट अॅप तयार करतात. महाराष्ट्रासह अन्य राज्यात असे बनावट अॅपवरून फसवणुकीचे जाळे फेकले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी क्रिकेट सट्टेबाजीच्या नादाला लागू नये.
आणखी पाच वर्षे मोफत धान्य; पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन
- देशातील ८० कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवणाऱ्या ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’ला आणखी पाच वर्षे मुदतवाढीचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी निवडणूक प्रचारसभेत दिले.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाहीर सभा घेतल्या. दोन्ही ठिकाणच्या प्रचारसभांमध्ये त्यांनी केंद्राची मोफत धान्यपुरवठा योजना आणखी पाच वर्षे सुरू ठेवण्याचे जाहीर केले.
- ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ करोना महासाथीच्या काळात, टाळेबंदी आणि अर्थचक्र थंडावल्याचा फटका बसलेल्या गरिबांसाठी २०२० मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे पाच किलो अन्नधान्य मोफत पुरवण्यात येते.
‘महादेवा’लाही बघेल यांनी सोडले नाही..
- कथित ‘महादेव’ बेटिंग अॅप घोटाळय़ावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी महादेवालाही सोडले नाही. या प्रकरणातील आरोपींशी आपला काय संबंध आहे हे बघेल यांनी जाहीर करावे, असे आव्हान मोदी यांनी दिले.
ट्रेन सुरू होण्याच्या १० मिनिटे आधी मिळवा कन्फर्म तिकीट; जाणून घ्या रेल्वेच्या तिकीट बुकिंगची नवी सुविधा
- सणासुदीच्या काळात गावी किंवा पर्यटनानिमित्त दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कन्फर्म ट्रेन तिकीट मिळणे म्हणजे खूप सरप्रायजिंग असते. विशेषत: दिवाळीत ट्रेनमध्ये कन्फर्म बर्थ मिळणे जवळपास अशक्य असते. प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे महिनाभर आधीच प्रतीक्षा यादी सुरू होते. पण, यंदा तुम्हीही दिवाळीनिमित्त ट्रेनने गावी जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही कन्फर्म ट्रेन तिकीट सहज मिळवू शकता.
- रेल्वेने प्रवाशांसाठी नवी सेवा सुरू केली आहे. रेल्वेच्या या नव्या सुविधेमध्ये तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या काही वेळ आधी कन्फर्म तिकीट मिळू शकते. तुम्हाला तुमचे कन्फर्म केलेले तिकीट ट्रेन सुटण्याच्या १० मिनिट आधी मिळू शकणार आहे.
- रेल्वेने प्रवाशांसाठी करंट तिकीट बुकिंग (Current Ticket Booking) नावाची एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेच्या मदतीने तुम्ही ट्रेन सुटण्याच्या काही वेळापूर्वी कन्फर्म तिकीट मिळवू शकता. रेल्वेतील सर्व सीट्स भरता याव्यात यासाठी रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे कोणतीही ट्रेन रिकामी जाणार नाही.
- रेल्वेच्या सध्याच्या तिकीट सुविधेचा लाभ ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेता येतो. म्हणजेच तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये चालू तिकीट बुक करून कन्फर्म तिकीट मिळवू शकता. तुम्ही ऑफलाइन प्रक्रिया निवडल्यास, तुम्हाला तिकीट काउंटरवर जाऊन आरक्षण फॉर्म भरावा लागेल.
कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळेल कन्फर्म तिकीट
- करंट तिकीट सिस्टम अनेक वेळा खूप फायदेशीर ठरते. जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत कुठेतरी जायचे असेल, तर तुम्ही अतिरिक्त शुल्क न भरता कन्फर्म तिकीट मिळवू शकता. या सुविधेत तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल की नाही, ते त्या ट्रेनमधील रिकाम्या सीट्सवर अवलंबून असेल.
- सध्याच्या तिकीट सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतरही तुम्ही तिकीट बुक करू शकता. भारतीय रेल्वेने प्रत्येक स्टेशनवर करंट तिकीट काउंटरदेखील उपलब्ध करून दिले आहे, जिथून तुम्ही तुमची सीट बुक करू शकता.
_
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा
_
दिनविशेष
६ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)
अधिक घडामोडी:
- ५ नोव्हेंबर २०२३ चालू घडामोडी
- ४ नोव्हेंबर २०२३ चालू घडामोडी
- ३ नोव्हेंबर २०२३ चालू घडामोडी
- २ नोव्हेंबर २०२३ चालू घडामोडी
- १ नोव्हेंबर २०२३ चालू घडामोडी
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | MPSC Today |
Daily Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |