७ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
७ सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 7 September 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

७ सप्टेंबर चालू घडामोडी

भारत आणि बांग्लादेश दरम्यान विविध क्षेत्रात ७ द्विपक्षीय करार.

भारत आणि बांग्लादेश दरम्यान विविध क्षेत्रात ७ द्विपक्षीय करार.

‘बांग्लादेश भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार’; शेख हसीना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये द्विपक्षीय चर्चा:

  • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल (सोमवार) शेख हसीना यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आज हसीना यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या दोघांमध्ये दोन्ही देशांमधील संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि नातं मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करण्यात आली.
  • संपूर्ण आशियामध्ये, बांगलादेशातून निर्यातीसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या प्रगतीला आणखी वेग देण्यासाठी आम्ही लवकरच द्विपक्षीय आर्थिक सर्वसमावेशक भागीदारी करारावर चर्चा सुरू करू.” असे मत बैठकीनंतर पंतप्रधानांनी व्यक्त केलं आहे. तसेच आगामी काळात भारत-बांगलादेश संबंध नवीन उंची गाठतील, असेही मोदी म्हणाले.
  • भारत आणि बांग्लादेशमध्ये पॉवर ट्रान्समिशन लाईनवरही चर्चा – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत दिल्लीत संयुक्त निवेदन जारी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत-बांगलादेश यांच्यातील व्यापार वेगाने वाढत आहे. “आम्ही आयटी, स्पेस आणि न्यूक्लियर क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि बांग्लादेशमध्ये पॉवर ट्रान्समिशन लाईनवरही चर्चा सुरू आहे.
  • बांगलादेशातील पूरस्थिती, दहशतवाद मुद्द्यांवर चर्चा – यावेळी दोन्ही नेत्यांनी पाणीवाटपाच्या महत्त्वाच्या करारावरही स्वाक्षऱ्या केल्या. जवळपास जगातील ५४ नद्या भारत-बांगलादेश सीमेवरून वाहतात. हा करार दोन्ही देशांमधील लोकांच्या उपजीविकेशी संबंधित आहे. तसेच या दोन्ही नेत्यांनी बांगलादेशातील पूरस्थिती, दहशतवाद, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा केली.

हरमनप्रीतला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन:

  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) वार्षिक पुरस्कारांमध्ये भारताच्या तीन खेळाडूंना नामांकने मिळाली आहेत.
  • भारताचा हुकमी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पीआर श्रीजेश आणि कर्णधार सविता पुनिया यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनाही नामांकन मिळाले आहे.
  • अंतिम पुरस्कारासाठी हरमनप्रीतची बेल्जियमच्या आर्थर डी स्लूवर, टॉम बून, जर्मनीच्या निक्लास वेलेन आणि नेदरलॅंड्सच्या थिएरी ब्रिंकमनशी स्पर्धा असेल. महिलांत सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी एकाही भारतीयाला नामांकन मिळाले नाही.
  • यंदाच्या नामांकनाचे वैशिष्टय़ म्हणजे हरनप्रीत, श्रीजेश आणि सविता यांना सलग दुसऱ्या वर्षी नामांकन मिळाले आहे. विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरच्या सुरुवातीला करण्यात येईल.

ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांकडून करकपातीचे सूतोवाच ; पहिल्याच भाषणात अर्थव्यवस्था सावरण्याचे आश्वासन:

  • लिझ ट्रस यांनी मंगळवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ट्रस यांची या पदावर अधिकृत नियुक्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी ‘१०, डाऊिनग स्ट्रीट’ या अधिकृत निवासस्थानी पंतप्रधान म्हणून पहिले भाषण केले. यावेळी त्यांनी करकपात करतानाच देशाची अर्थव्यवस्था सावरण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. 
  • स्कॉटलंडमधील सुटीकालीन निवासस्थानी ट्रस यांनी महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेतली. तत्पूर्वी मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी महाराणींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. आपल्या पहिल्या भाषणात ट्रस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी लादलेल्या युक्रेन युद्धामुळे ब्रिटनमध्ये विजेचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, आपण त्याचा यशस्वी मुकाबला करू, अशी ग्वाही त्यांनी दिले. 
  • आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा करतील. अ‍ॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन या नव्या मंत्रिमंडळातील भारतीय वंशाचा एकमेव चेहरा असण्याची शक्यता आहे. जॉन्सन यांचे विश्वासू, माजी गृहमंत्री प्रीती पटेल आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी ट्रस  मंत्रिमंडळात सहभागी होण्यास अप्रत्यक्ष नकार दिला आहे.
  • मंत्रीमंडळात भारतीय वंशाचा एकमेव चेहरा – ट्रस मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. त्यांचे वडील क्रिस्टी यांचा जन्म गोव्यात झाला, तर आई उमा फर्नाडिस यांचा जन्म मॉरिशसमधील तमिळ कुटुंबातला आहे.

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला आज कन्याकुमारीतून आरंभ:

  • सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ बुधवारपासून कन्याकुमारी येथून सुरू होत आहे. ३,५७० किलोमीटरच्या या यात्रेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी सज्ज झाले आहेत. काँग्रेस पक्षाने या पदयात्रेचे वर्णन आजपर्यंतचा सर्वात मोठा जनसंपर्क कार्यक्रम असा केला आहे.
  • महागाई, बेरोजगारी तसेच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकारणाच्या केंद्रीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तीव्र झालेल्या प्रश्नांकडे केंद्रातील सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. केंद्र सरकारविरोधात देशातील जनतेने संघटित होणे हे या पदयात्रेचे उद्दिष्ट आहे. वाढती बेरोजगारी, वाढत्या किमती आणि वाढती असमानता या समस्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहेच, पण केंद्र सरकारमुळे निर्माण झालेले भय, धर्माधता आणि पूर्वग्रहदूषित राजकारणाविरोधात देश आणि सर्वसामान्य नागरिकांना एकत्र येण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
  • या पदयात्रेला प्रांरभ करण्यापूर्वी राहुल गांधी त्यांचे पिता आणि माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या श्रीपेरूंबदुर येथील स्मृतीस्थळी जाऊन प्रार्थनासभेत भाग घेतील. त्यानंतर कन्याकुमारी येथील कार्यक्रमात राहुल सहभागी होतील. तिथे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित असतील. या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या हाती खादीचा राष्ट्रध्वज देण्यात येईल आणि त्यानंतर पदयात्रेला प्रारंभ करण्यात येईल.
  • ३,५७० किलोमीटरची ही पदयात्रा कन्याकुमारीपासून काश्मीपर्यंत असेल.

मिस्त्री यांच्या निधनानंतर गडकरींचे नवे आदेश, कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास दंड:

  • टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सीट बेल्ट संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारमध्ये बसणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट घालणे अनिवार्य असेल, असे ट्वीट गडकरी यांनी केले आहे. “सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर कारमध्ये मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासाठी सीट बेल्ट बीप प्रणाली देखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे”, अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.
  • या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना दंड ठोठावला जाणार आहे. या आदेशाची येत्या तीन दिवसांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. सायरस मिस्री यांच्या निधनानंतर तज्ज्ञ आणि टीकाकारांनी वाहतूक सुरक्षेसंदर्भातील नियमांकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहेत.
  • “मागील सीटवर बसलेल्यांनी सीट बेल्ट लावण्याची गरज नाही असे लोकांना वाटते. चारचाकीत प्रवास करताना फक्त पुढे बसलेल्यांनीच सीट बेल्ट लावायचा असतो, अशी लोकांची समजूत आहे. पुढे आणि मागे बसलेल्या सर्वांनी सीट बेल्ट लावला पाहिजे”, असे आवाहन एका कार्यक्रमात गडकरी यांनी नुकतेच केले होते.
  • अहमदाबादकडून मुंबईच्या दिशेने येत असताना सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडिज कारला पालघरमध्ये अपघात झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासोबतच जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला आहे. मागील सीटवर बसलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नव्हता, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कार पुलाच्या कठड्याला धडकताच कारमधील संरक्षक ‘एअर बॅग’ उघडल्या. त्याचवेळी मिस्त्री आणि जहांगीर आसनावरून फेकले गेल्याने त्यांचे संरक्षण होऊ शकले नाही. या अपघातानंतर रस्ते वाहतूक सुरक्षेसदंर्भातील मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

SC न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांची NALSA चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) चे पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद यापूर्वी भारताचे सरन्यायाधीश यूयू ललित यांच्याकडे होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड ची NALSA चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी, न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि त्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले होते.

क्रिडा

Max Verstappen ने डच F1 ग्रांप्री 2022 जिंकली
रेड बुलचा ड्रायव्हर Max Verstappen याने डच फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स 2022 जिंकला आहे. मर्सिडीजचे जॉर्ज रसेल आणि फेरारीचे चार्ल्स लेक्लेर्क अनुक्रमे 2रे आणि 3रे स्थानावर आले आहेत. वर्स्टॅपेनने आता या हंगामातील 15 शर्यतींपैकी 10 शर्यती जिंकल्या आहेत. हे त्याचे 72 वे पोडियम फिनिश होते आणि त्याने या शर्यतीतून 26 गुण जमा केले. वर्स्टॅपेनने 2021 मध्ये डच जीपी जिंकले. त्याने आता एकूण 30 शर्यती जिंकल्या आहेत.

भारतीय जीएम अरविंद चिथंबरम यांनी दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली
ग्रँडमास्टर अरविंद चिथंबरमने २२ वी दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा ७.५ गुणांसह जिंकली. सात भारतीयांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळविले, तर आर. प्रज्ञानंध पाच इतरांसह दुसऱ्या स्थानावर होते. नवव्या आणि अंतिम सामन्यात अरविंद चिथंबरम आणि आर. प्रग्नानंद यांनी बरोबरी साधली, ज्यामुळे अरविंद चिथंबरमला उर्वरित मैदानापेक्षा साडेसात गुणांनी सामना संपवता आला.

भारतीय जीएम अरविंद चिथंबरम यांनी दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली

सुरेश रैनाने इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची केली घोषणा
माजी भारतीय फलंदाज सुरेश रैनाने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती जाहीर केली. सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग्सने कायम ठेवले नाही किंवा त्याला यंदाच्या आयपीएल 2022 मेगा ऑडिशनमध्ये कोणत्याही संघाने निवडले नाही. रैना आतापासून कोणतीही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळणार नाही. 2019 मध्ये, रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी एमएस धोनीप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

निर्देशांक

तक्रार निवारण निर्देशांक 2022
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सर्व मंत्रालये/विभागांमध्ये अव्वल स्थानावर आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (DARPG) हा अहवाल प्रकाशित केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की UIDAI भारतातील लोकांच्या सेवेसाठी आणखी वचनबद्ध आहे आणि राहणीमान आणि व्यवसाय दोन्हीसाठी एक उत्प्रेरक आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

७ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.