९ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
९ मार्च चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) |9 March 2023

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

९ मार्च चालू घडामोडी

BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस, ‘या’ राज्यापासून होणार सुरुवात

  • बीएसएनएल ही भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते. बीएसएनएल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. मात्र आता बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सर्व्हिस लॉन्च करणार आहे.
  • भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) लवकरच भारतात 4G सर्व्हिस लॉन्च करणार आहे. बीएसएनएलने पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये कमर्शिअल ४ जी सेवा सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कडून काही उपकरणे खरेदी करत आहे. मागील महिन्यामध्ये कंपनीने TCS कन्सोर्टियमकडून उपकरणांसाठी तब्बल २४,५०० कोटींचा कर्ररला मंजुरी दिली आहे.
  • माध्यमांच्या माहितीनुसार BSNL कंपनी २०० साईट्ससाठी उपकरणे प्री-ऑर्डर करत आहे. ज्याचा सध्या सुरुवातीला वापर हा पंजाब राज्यामध्ये केला जाणार आहे. सुरुवातीला पंजाबच्या फिरोजपूर, अमृतसर आणि पठाणकोट या तीन जिल्ह्यांमध्ये ४ जी सेवा लॉन्च केली जाणार आहे. ४ जी सेवा लॉन्च करण्यासाठी BSNL च्या पायलट प्रोजेक्टचा हा एक भाग आहे. अजून टीसीएसच्या अंतिम निविदेला सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. टीसीएसला १ लाख ४ साईट्ससाठी मार्च महिन्याच्या शेवट्पर्यंत सरकारची मान्यता मिळू शकते. कंपनी पंजाबमधून या सेवांसाठी टेस्टिंग सुरू करणार आहे.
  • TCS च्या मालकीच्या Tejas Networks ने आधीच सुमारे ५० साईटसाठी उपकरणे पुरविली आहेत. ज्यासाठी C-DOT (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स) सॉफ्टवेअर पॅच अपग्रेड तैनात केले जाऊ शकते. सरकारी अधिकाऱ्यांच्या मतानुसार, मार्चच्या मध्यापर्यंत ४जी लॉन्च होण्यासाठी सुमारे १०० साईट्स तयार असण्याची अपेक्षा आहे. जर का सर्व गोष्टी प्लॅननुसार झाल्या तर, BSNL आपली ४ जी सेवा एप्रिल महिन्यात लॉन्च करू शकते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २० संसदीय समित्यांवर वैयक्तिक कर्मचारी नेमले

  • उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांच्या वैयक्तिक आठ कर्मचाऱ्यांची संसदेच्या १२ स्थायी समित्या आणि स्थायी समित्यांशी निगडित विविध आठ विभागात नेमणूक केली आहे. ही माहिती बाहेर आल्यानंतर यावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. उपराष्ट्रपती यांचे ओएसडी असलेले राजेश नाईक, खासगी सचिव सुजीत कुमार, अतिरिक्त खासगी सचिव संजय वर्मा आणि ओएसडी अभ्युदय सिंह शेखावत यांची वेगवेगळ्या समित्यांवर नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्यसभा सभापतींच्या कार्यालयात ओएसडी अखिल चौधरी, दिनेश डी., कौस्तुभ सुधाकर भालेकर आणि खासगी सचिव अदिती चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मंगळवारी यासंबंधीचे निवेदन जाहीर करण्यात आले. राज्यसभेच्या सचिवांनी सांगितले की, विविध समित्यांवर उपरोक्त अधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती केली जात आहे. पुढील आदेश येईपर्यंत ते या पदांवर असतील. इंडियन एक्सप्रेसला नाव न सांगण्याच्या अटीवर राज्यसभेतील एका ज्येष्ठ खासदाराने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या नेमणुका करून राज्यसभेच्या इतिहासातील अभूतपूर्व असा आदेश देण्यात आला आहे.
  • काँग्रेसचे लोकसभेतील खासदार मनीष तिवारी यांनी ट्वीट करत म्हटले, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती आहेत. ते उपसभापतींसारखे राज्यसभेचे सदस्य नाहीत. ते संसदीय समित्यांवर त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांना कसे काय नेमू शकतात? हे एक प्रकारे संस्थात्मक रचनेचे अपहरण नाही का?

महिला सबलीकरणासाठी सरकार कटिबद्ध- मोदी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारताच्या प्रगतीमध्ये महिलांनी बजावलेल्या भूमिकेची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले, की आपले सरकार महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी अविरत काम करत राहील.
  • या संदर्भात मोदींनी ‘ट्वीट’ केले, की आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आमच्या महिलाशक्तीच्या कामगिरीबद्दल सलाम! देशविकासात महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. आमचे सरकार महिला सबलीकरण प्रक्रिया अविरत चालण्यासाठी काम करत राहील. यावेळी मोदींनी विविध क्षेत्रांत यशोशिखर गाठणाऱ्या महिलांची संकलित माहिती ‘ट्विटर’वर प्रसृत केली. या महिलांच्या कामगिरीविषयी त्यांनी यापूर्वी आपल्या ‘मन की बात’ संवादसत्रात माहिती दिली होती.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘नारी शक्ती’ने विविध क्षेत्रांत दिलेल्या गौरवशाली योगदानाचे स्मरण केले. त्यांनी ‘ट्वीट’ केले, की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील हे सरकार विविध प्रभावी योजना व उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत आहे. लष्करात सियाचीनमध्ये तैनात होण्यापासून ते युद्धनौकांवर सेवेपर्यंत भारतीय महिला सशस्त्र दलांतील प्रत्येक आव्हानांवर सक्षमतेने मात करत आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही महिला दिनानिमित्त शुभेच्छा देताना स्वावलंबी भारताच्या विकासगाथेत महिला शक्तीच्या योगदानाची प्रशंसा केली.

कृषी आणि सेवा क्षेत्रांत राज्याला फटका, दरडोई उत्पन्नात पाचव्या क्रमांकावर

  • कृषी आणि सेवा क्षेत्राने करोना काळातही राज्याला आधार दिला होता. करोनातून राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येत असली तरी गतवर्षाच्या तुलनेत कृषी आणि सेवा या दोन महत्त्वांच्या क्षेत्रांमध्ये राज्याची पिछेहाट झाली आहे. याशिवाय दरडोई उत्पन्नात महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य पाचव्या क्रमांकावर मागे पडले आहे.
  • देशाचा विकासाचा दर सात टक्के असताना २०२२-२३ या वर्षात राज्याचा विकास दर हा ६.८ टक्के असेल. राष्ट्रीय विकास दराच्या तुलनेत महाराष्ट्राचा विकास दर कमी आहे. कृषी क्षेत्रात १०.२ टक्के, उद्योग क्षेत्र ६.१ टक्के, तर सेवा क्षेत्राचा विकास दर हा ६.१ टक्के अपेक्षित धरण्यात आला आहे. राज्याची निम्मी लोकसंख्या ही कृषी किंवा कृषीवर आधारित उद्योगांवर अवलंबून असते. २०२१-२२ मध्ये कृषी क्षेत्राचा विकास दर ११.४ टक्के होता. या तुलनेत चांगला पाऊस होऊनही विकास दर घटला आहे.
  • सेवा क्षेत्राने राज्याला गेली काही वर्षे चांगला हात दिला. आधीच्या वर्षी सेवा क्षेत्राचा विकास दर १०.६ टक्के होता. पण चालू आर्थिक वर्षात हा दर ६.४ टक्क्यांपर्यंत घटणार आहे. सेवा क्षेत्रातील घट ही आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी राज्यासाठी चिंतेची बाब आहे.
  • दरडोई उत्पन्नात कर्नाटक, तेलंगणा, हरयाणा आणि तमिळनाडू या चार राज्यांनी महाराष्ट्राला मागे टाकले आहे. दरडोई उत्पन्नात २०२१-२२ या वर्षात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर होते. कर्नाटक (२,७८,७८६), तेलंगणा (२,७५,४४३), हरयाणा (२,७४,६३५), तमिळनाडू (२,४१,१३१), तर महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे २ लाख १५ हजार २२३ होते.

माध्यमिक शाळांमधील मुलींच्या पटसंख्येत १६ टक्क्यांनी घट

  • राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींची पटसंख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १६ टक्क्यांनी घसरली आहे. करोनानंतरच्या काळात मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर घसरणे चिंताजनक आहे. त्या तुलनेत प्राथमिक शाळांमधील पटसंख्येची मुलींची पटसंख्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत ४७.१ टक्क्यांवरुन ४७.३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
  • करोनाकाळात सर्वानाच मोठा आर्थिक फटका बसला. आर्थिक दुरवस्थेमुळे मुलींना माध्यमिक शाळांमधून काढून शेतमजुरी, नोकरी, व्यवसायाला लावणे किंवा त्यांचे विवाह लावून देण्याचे प्रमाण वाढले असावे, असा अंदाज आहे. प्राथमिक शाळांमध्ये सुमारे एक कोटी ५४ लाख विद्यार्थी शिकत असून त्यापैकी ४७.३ टक्के मुली आहेत. माध्यमिक शाळांच्या तुलनेत प्राथमिक शाळांमधील मुलींचे प्रमाण बरेच घटले असल्याने राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्थांना ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
  • अनेक प्राथमिक शाळांना राज्य सरकारने अनुदान सुरू केल्याने स्वयंअर्थसहाय्यित शाळांची एकूण शाळांशी असलेली टक्केवारी २१.६ टक्क्यांवरुन १६.३ टक्क्यांवर घसरली आहे. मात्र शाळांमधील शिक्षकांची संख्या १० हजाराने कमी होऊन पाच लाख इतकी झाली आहे.
  • राज्यात सहा विद्यापीठांची भर : राज्यातील विद्यापीठांची संख्या ६५ वरून ७१ झाली असून महाविद्यालयांची संख्या ४४९४ वरून ४५३२ इतकी झाली आहे. उच्चशिक्षण संस्थांमधील महिलांची टक्केवारी ४५.१९ टक्के इतकी झाली आहे. आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २०२१-२२ या वर्षांत उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी आदी विविध अभ्यासक्रमांसाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांहून अधिक निधी देण्यात आला आहे.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल: चेल्सीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

  • रहीम स्टर्लिग आणि काय हावेट्झ या आक्रमकपटूंनी केलेल्या गोलच्या बळावर चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधील उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात बुरुसिया डॉर्टमंडवर २-० असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. चेल्सीचा संघ पहिल्या टप्प्यातील सामन्यानंतर ०-१ असा पिछाडीवर होता. मात्र, दोन सामन्यांनंतर चेल्सीने २-१ अशा एकूण फरकासह आगेकूच केली.
  • सामन्याच्या सुरुवातीला डॉर्टमंडच्या बचावफळीने चेल्सीवर दडपण निर्माण केले. ४२व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र, ४३व्या मिनिटाला स्टर्लिगने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
  • मध्यंतरापर्यंत चेल्सीकडे ही आघाडी कायम होती. दुसऱ्या सत्रात ५३व्या मिनिटाला चेल्सीला पेनल्टी मिळाली. यावर हावेट्झला गोल करण्यात अपयश आले. मात्र, त्याने पेनल्टी मारण्यापूर्वीच दोन्ही संघांच्या काही खेळाडूंनी गोलकक्षात प्रवेश केल्याचे पंचांच्या निदर्शनास आल्याने हावेट्झला पुन्हा पेनल्टी मारण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने कोणतीही चूक न करता चेल्सीला २-० अशी आघाडी मिळवून दिली. चेल्सीने मग भक्कम बचाव करताना विजय मिळवला आणि पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

सापाच्या प्रजातीला मिळाले विदेशात अस्तित्व:

  • तुर्कमेनिस्तान देशातून नुकत्याच एका सुंदर सापाच्या प्रजातीला त्याचे अस्तित्व मिळवून देण्याचे काम वन्यजीव संशोधकांनी केले आहे.
  • या संशोधनामध्ये 11 देशांमधील विविध संशोधकांचा समावेश आसून, भारतामधून अमीत सैय्यद, विवेक शर्मा, एस. आर. गणेश, तसेच एच. टी. लारेमसंगा यांचा मोलाचा वाटा आहे.
  • ‘लायकोडॉन बायकलर’ असे याचे नाव असून, हा ‘लायकोडॉन’ कुळातील साप आहे.
  • या कुळातील सापांना इंग्रजीत ‘उल्फ स्नेक्स’, तर मराठीत ‘कवड्या’ जातीचा साप म्हणतात.
  • ‘लायकोडॉन’ कुळात आतापर्यंत 73 प्रजातींच्या सापांची नोंद आहे. ‘लायकोडॉन बायकलर’ हा पूर्वी ‘लायकोडॉन स्टेयेटस’ नामक एका प्रजातीच्या नावाने ओळखला जात होता.
  • भारत, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, तसेच तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये या सापाची नोंद असल्याचे नमूद केले गेले होते.

ICC टेस्ट रॅंकिंगमध्ये या खेळाडूंनी मारली बाजी:

  • भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) बुधवारी जारी केलेल्या रॅंकिंगमध्ये सहा अंकांचं नुकसान झालं आहे.
  • पण अश्विन इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसनसोबत संयुक्तपणे नंबर वन टेस्ट गोलंदाज बनला आहे.
  • अश्विन मागच्या आठवड्यात टेस्ट गोलंदाजीच्या रॅंकिंगमध्ये नंबर एकवर पोहोचला होता.
  • ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियोनही अव्वल स्थानापासून जास्त दूर नाही.
  • फलंदाजीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज उस्मान ख्वाजा दोन नंबर पुढे जाऊन नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
  • भारतीय संघाचा कर्णधार टॉप-10 मधून बाहेर झाला आहे.
  • ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन पहिल्या स्थानावर आहे.
  • स्मिथ दुसऱ्या आणि जो रूट तिसऱ्या स्थानावर आहे.

_

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

_

दिनविशेष

९ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी:

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.