भारतातील महत्त्वाचे रेल्वे-समुद्री पूल
भारतातील महत्त्वाचे रेल्वे-समुद्री पूल

1) पंबन रेल्वे पूल

पंबन रेल्वे पूल
पंबन रेल्वे पूल
  • रामेश्वरमजवळ पंबन बेटापासून मुख्य किनारी येण्यासाठी बांधण्यात आलेला हा रेल्वे पूल आहे. १९११ साली याची सुरुवात झाली.
  • १४ फेब्रुवारी १९१४ साली हा लोकांसाठी खुला करण्यात आला.
  • पंबन रेल्वे पूल हा भारतामधील पहिला समुद्री पूल आहे.
  • २०१० साली वांद्रे-वरळी सी-लिंकला सुरुवात होण्यापूर्वी हा भारतामधील सर्वात लांब समुद्री पूल होता.
    काँक्रिट खांबाचा यात वापर करण्यात आला आहे.
  • दोन खांबामध्ये इतके अंतर ठेवण्यात आले आहे, की ज्याच्यामधून नौका आणि जहाजे जाऊ शकतील.
  • याला समांतर असा पूल बांधण्यात आला आहे. १९८८ साली लोकांसाठी हा रस्ता खुला करण्यात आला.

2) वांद्रे-वरळी सी लिंक

warli sea link
warli sea link
  • वांद्रे-वरळी सी लिंकचे अधिकृत नाव राजीव गांधी सी लिंक असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे.
  • यासाठी काँक्रिट स्टील मटेरियल वापरण्यात आले आहे.
  • नरीमन पॉईंटला जोडणाऱ्या फ्री वे चा हा एक भाग आहे.
  • या पुलासाठी १६०० कोटी इतका खर्च आला आहे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने देखरेख केलेला हा पूल आहे.
  • ३० जून २००९ साली ८ पैकी ४ मार्ग खुले करण्यात आले.
  • २४ मार्च २०१० साली सर्व ८ मार्ग खुले केले गेले.
  • वरळी आणि वांद्रे यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी हा पूल बांधण्यात आला आहे.

3) कांडरौर पूल

kandrour-bridge-bilaspur
kandrour-bridge-bilaspur
  • हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथे सतलज नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे.
    कांडरौर गावात हा पूल आहे.
  • कांडरौर पुलाची उंची ८० मी. इतकी आहे.
  • १९५९ साली याची सुरुवात झाली आहे आणि १९६४ साली हा खुला करण्यात आला.
  • पुलाची रुंदी ७ मीटर आहे. नदीच्या पात्रापासून ६० मीटर उंचीवर हा पूल बांधण्यात आला आहे. जगातील सर्वांत उंचीवर बांधण्यात आलेल्या पुलापैकी एक आणि आशियामधील सर्वांत उंच पूल अशी याची ख्याती आहे.
  • कांडरौर पूल हा हमीरपूर जिल्हा आणि बिलासपूर जिल्हा यांना जोडतो. बिलासपूरपासून आठ
    कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८८ वर आहे.

4) विद्यासागर सेतू

vidyasagar setu
vidyasagar setu
  • विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पुल असेही म्‍हणता येईल.
  • पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा हा सेतू आहे.
  • या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्‍स द्यावा लागतो, मात्र सायकलींना हा कर नाही.
  • विद्यासागर सेतू हा आशियाईतील सर्वांत लांब पुलांपैकी एक आहे. १९व्‍या शतकातील सुधारक ईश्‍वरचंद विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्‍यात आले आहे.
  • हावडा पूल आणि विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्‍या कामाची सुरुवात १९७८ साली झाली आणि १० ऑक्‍टोबर १९९२ रोजी याचे उद्घाटन करण्‍यात आले. याची रुंदी ३५ मीटर असून, लांबी ४७५ मीटर इतकी आहे.
  • या सेतूचे बांधकाम विख्‍यात ब्रेथवेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले आहे.
  • या सेतूवर १८२.८८ मीटर लांबीची समांतर केबल वायर जोडण्‍यात आली आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *