जोतीराव गोविंदराव फुले
जोतीराव गोविंदराव फुले

महात्मा जोतिबा फुले – जोतीराव गोविंदराव फुले

 (एप्रिल ११ , इ.स. १८२७ – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०), महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.

त्यांनी सत्यशोधक समाजनावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली.

‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते.

त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.

कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे.

खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.

जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला.

प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला.

इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. 

जीवनपट

इ.स. १८२७ – जन्म कटगुण, सातारा जिल्हा

इ.स. १८३४ ते १८३८ – पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

इ.स. १८४० – सावित्रीबाईंशी विवाह.

इ.स. १८४१ ते १८४७ – स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

इ.स. १८४७ – थॉमस पेन यांच्या ‘राईट ऑफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास.

इ.स. १८४८ – मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

इ.स. १८४८ – भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

सप्टेंबर ७, इ.स. १८५१ – भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

इ.स. १८५२ – पूना लायब्ररीची स्थापना.

मार्च १५, इ.स. १८५२ – वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

नोहेंबर १६, इ.स. १८५२ – मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

इ.स. १८५३ – ‘दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स’ स्थापन केली.

इ.स. १८५४ – स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी

इ.स. १८५५ – रात्रशाळेची सुरुवात केली.

इ.स. १८५६ – जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

इ.स. १८५८ – शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

इ.स. १८६० – विधवाविवाहास साहाय्य केले.

इ.स. १८६३ – बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .

इ.स. १८६५ – विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

इ.स. १८६४ – गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

इ.स. १८६८ – दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

इ.स. १८७३ – सत्यशोधक समाजची स्थापना केली.

इ.स. १८७५ – शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

इ.स. १८७६ ते १८८२ – पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

इ.स. १८८० – दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

इ.स. १८८० – नारायण मेघाजी लोखंडे यांना ‘मिलहॅण्ड असोसिएशन’ या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

इ.स. १८८२ – ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा’ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

इ.स. १८८७ – सत्यशोधक समाजातर्फे नवीन

११ मे १८८८ रोजी मुबई येथील कोळीवाडा (मांडवी) या समारंभामध्ये मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादुर वडेकर यांनी फुल्ले यांना “महात्मा” ही पदवी दिली. लोखंडे आणि वंडेकर यांनी फुलेंना महात्मा म्हणून गौरवणे किती योग्य आहे, हे आपल्या भाषणात मांडलं. या कार्यक्रमाच्या सविस्तर बातम्या त्यावेळी वर्तमानपत्रात झळकल्या होत्या. फुलेंच्या चरित्रात त्याचा उल्लेख आढळतो.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

2 Comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *