MPSC STI Exam Syllabus in Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) विविध गट अ, गट ब आणि गट क पदांसाठी विविध परीक्षा घेते. MPSC अधीनस्थ गट B एकत्रित परीक्षा MPSC द्वारे STI, PSI आणि ASO या तीन पदांसाठी भरण्यात येते.

एसटीआय हे महाराष्ट्र सरकारमधील ब गटाचे पद आहे.

STI चे पूर्ण रूप राज्य कर निरीक्षक आहे. यापूर्वी, जीएसटी कायदा लागू होण्यापूर्वी, एसटीआयचे पूर्ण स्वरूप विक्रीकर निरीक्षक होते.

STI Preliminary Syllabus

सामान्य क्षमता चाचणी:

प्रश्नसंख्या – १००   एकूण गुण – १००   दर्जा – पदवी   वेळ – १ तास  प्रश्न स्वरूप – वस्तुनिष्ठ

१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)

३. आधुनिक भारताचा विशेषत:  महाराष्ट्राचा इतिहास

४. भूगोल  (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह)- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

५. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी

६. सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.

७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

STI Mains New Syllabus (एकूण प्रश्न पत्रिका – २)

एकूण गुण २०० (१०० + १००) प्रश्न स्वरूप– वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

पेपर १- इंग्रजी व मराठी        कालावधी – १ तास

  1. मराठी : ६० गुण / प्रश्न ६०/ दर्जा – मराठी – बारावी / माध्यम – मराठी
  2. इंग्रजी : ४० गुण / प्रश्न ४०/ दर्जा – मराठी – पदवी / माध्यम – इंग्रजी

पेपर २ – सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान           कालावधी – १ तास

१०० गुण / प्रश्न १००/ दर्जा – पदवी/ माध्यम – मराठी व  इंग्रजी

अभ्यासक्रम:

पेपर १:

इंग्रजी – Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे .

पेपर २ – सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान

Read More

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *