सराव प्रश्न (Practice Questions)

१) ‘भाववाचक नाम’ ओळखा
१) उंची
२) शरद
३) पुस्तक
४) झाडे

उत्तर: १

२) खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा
१) ती हळू चालते
२) रघु खूप झोपला
३) रमेश दुध पितो
४) तो मूर्ख आहे

उत्तर: ३

३) कंसातील शब्दांचे सामान्यरूप निवडा . माझ्या ( अंगण ) एक वडाचे झाड आहे
१) अंगणाला
२) अंगणाशी
३) अंगणाचे
४) अंगणा

उत्तर: ४

४) ‘परंतु’ हा शब्द कोणत्या अव्ययाचा सूचक आहे ?
१) उभयान्वयी अव्यय
२) शब्दयोगी अव्यय
३) क्रियाविशेषण अव्यय
४) केवलप्रायोगी अव्यय

उत्तर: १

५) कर्ता – कर्म – क्रियापद यांच्या परस्पर संबंधाना ……….म्हणतात
१) वाक्य
२) शब्दसमूह
३) कर्तरी प्रयोग
४) प्रयोग

उत्तर: ४

६) ‘ पुस्तक ‘ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंगप्रकारात येतो ?
१) नपुसंकलिंग
२) पुल्लिंग
३) स्त्रीलिंग
४) यापैकी नाही

उत्तर: १

७) ‘ मी निबंध लिहिते असे ‘ या वाक्यातील काळ ओळखा
१) रीती भूतकाळ
२) रीती वर्तमानकाळ
३) रीती भविष्यकाळ
४) अपूर्ण भूतकाळ

उत्तर: १

८) ‘ आणि ‘ हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?
१) विकल्पबोधक
२) परिणामबोधक
३) संकेतबोधक
४) समुच्चयबोधक

उत्तर: ४

९) अरेरे ! गंगारामचं अजून लग्न झालेलं नाही या वाक्यामध्ये ‘अरेरे ‘हा कोणता अव्यय आहे ?
१) उभयान्वयी
२)क्रियाविशेषण
३)केवलप्रयोगी
४)शब्द योगी

उत्तर: ३

१०) खालीलपैकी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण कोणते ?
१) तुला पुस्तक हवे की पेन्सिल हवी ?
२) पाऊस आला आणि हवेत गारवा झाला
३) मला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक.
४) खुप अभ्यास केला म्हणून पास झालो.

उत्तर: २

११)’बाभळी मुद्रा व देवळी निद्रा ‘या म्हणीचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.
१) दिसण्यास बावळट व व्यवहार चतुर माणुस
२) अत्यंत बावळट माणुस
३) बाभळीखाली असणा-या देवळात झोपणारा
४) खूपच आळशी माणुस

उत्तर: १

१२) गडद निळे गडद निळे जलद भरून आले, शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले | हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
१) यमक
२) पुष्यमक
३) अनुप्रास
४) श्लेष

उत्तर: ३

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *