विकारी शब्द
ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
१) नाम: (संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ ,जागा,
- व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
- जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
- भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
- समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
- द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना
२) सर्वनाम: नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
- पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
- निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
- अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
- संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
- प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?
३) विशेषण: नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
- गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
- संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
- परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
- संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
४) क्रियापद: एखादी क्रिया घडणे .
- सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
- अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
- संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
अविकारी शब्द:
ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
१.क्रियाविशेषण:
क्रियाविशेषणाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
- तेथे कर माझे जुळतील.
- तेथून नदी वाहते.
- काल शाळेला सुट्टी होती.
- परमेश्वर सर्वत्र आहे.
- रस्त्यातून जपून चालावे.
- तो वाचताना नेहमी अडखळतो.
- मी अनेकदा बजावले.
क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
- स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
- कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
- परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
- रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात .
२) शब्दयोगी अव्यव:
नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते ,आत ,बाहेत,जवळ,पुढे .
जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो. त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
शब्दयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे –
- त्याच्या घरावर कौले आहेत.
- टेबलाखाली पुस्तक पडले.
- सूर्य ढगामागे लपला.
- देवासमोर दिवा लावला.
- शाळेपर्यंत रस्ता आहे.
३) उभयान्वयी अव्यय:
दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि ,पण,परंतु, किंवा .
उभयान्वयी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे –
- विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
- आंबा व फणस ही कोकणातील फळे आहेत.
- जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल.
- तो म्हणाला की, मी हरलो.
- वैद्याने चांगले औषध दिले पण उपयोग झाला नाही.
४) केवळ प्रयोगी अव्यय:
आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द . वाह !, अरे !, छट !
जी अव्यय बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात. त्यांना केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात.
केवलप्रयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे –
- अय्या ! इकडे कुठे तू ?
- अरेरे ! काय दशा झाली त्याची !
- चूप ! एक शब्द बोलू नको.
- आहा ! किती सुंदर फुले !
You people are very helpful to me for improvement because I want to give the competitive exams of MPSC
Nice
Very helpful for students