अस्थी संस्था (Skeletal System)
अस्थी संस्था (Skeletal System)

अस्थी संयोजी उतींचा एक प्रकार असून त्यामुळे आपल्या शरीराच्या आकृतिबंध तयार होतो. जन्मतः आपल्या शरीरात 272  अस्थी असून प्रौढ व्यक्तींमध्ये अनेक लहान अस्थी एकमेकांना जोडून 206 अस्थी शिल्लक राहतात. वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत अस्थी पूर्णपणे भरल्या जाऊन त्यांची घनता वाढते.  कॅल्शियम आणि फॉस्फोरसमुळे अस्थींना मजबुती प्राप्त होते.

अस्थी संस्था (Skeletal System)

कार्य:

१) अस्थींमुळे शरीराला आधार मिळून मजबुती व संरक्षण प्राप्त होते.

२) अस्थींमुळे हालचाल घडून येते तसेच रक्तपेशींची निर्मिती होण्यास मदत होते.

३) अस्थींमध्ये विविध आयन साठविले जातात तसेच अंतःस्त्रावी संस्थेचे नियमन केले जाते.

१) अक्षीय / केंद्रीय अस्थिसंस्था (Axial skeleton System):

यामध्ये शरीरातील ऐकणं 80 अस्थींचा समावेश होतो. आपल्या शरीरात खालील अवयवांमध्ये या अस्थी आढळतात.

कवटी (Skull):

कवटीमध्ये कर्पर आणि चेहरा यातील 22  अस्थींचा समावेश होतो.

कवटी 8 अस्थींपासून तर चेहरा 14 अस्थींपासून बनलेला असतो.

मानेमध्ये U आकाराची हॅऑईड (Hyoid) ही लहान अस्थी असून ती इतर कोणत्याही अस्थीला जोडलेली नसते, परंतु त्यास जीभ आणि  मानेचे स्नायू जोडलेले असतात.

कॉलर बोन (Collar Bone) म्हणजेच क्लॅव्हिकल हि अस्थी मानेमध्ये आढळते. तसेच पाठीमध्ये स्कॅप्युला (Scapula) ही अस्थी आढळते.

कशेरुस्तंभ / पाठीचा कणा (Vertebral Column):

कशेरुस्तंभ म्हणजे आपल्या चेतारज्जूला संरक्षण देणारी अस्थिसंस्था होय व ती एकूण 33 अस्थींपासून बनलेली असते, त्यांना मणके (Vertebrae) असे म्हणतात. त्यांचे पाच भाग पडतात.

सर्व्हायकल मणके (मान) C1-C7संख्या 07
थोरॅसिक मणके (छाती) T1-T12संख्या 12
लंबर (कंबर ) L1-L5संख्या 05
सॅक्रल (त्रिकास्थी) S1-S5संख्या 05
कोंकिक्स (माकडहाड)संख्या 04

छातीचा पिंजरा /बरगडी (Rib Cage):

आपल्या बरगड्या 12 अस्थींच्या जोड्यांपासून तसेच स्टर्नम नावाच्या एका अस्थीपासून म्हणजेच एकूण 25  अस्थींपासून बनलेल्या असतात. यांनाच फासळ्या असेही म्हणतात. बरगड्यांतील अस्थी ज्या एका अस्थीपासून निघतात त्यास स्टर्नम (Sternum) असे म्हणतात.

२) सह / उपांगे अस्थीसंस्था (Appendicular Skeletal System):

यामध्ये एकूण 126 अस्थींचा समावेश होतो. यांच्यामुळे आपल्या शरीराचा सांगाडा पूर्ण होतो. तसेच शारीरिक हालचाली घडून येतात. यांचे प्रमुख सहा गटात वर्गीकरण केले जाते.

कॉलर बोन2 अस्थी
स्कॅपूला2 अस्थी
दंड (Humerus)प्रत्येकी 2 अस्थी
बाहू (Ulna)प्रत्येकी 2 अस्थी
मनगटप्रत्येकी 8 अस्थी
तळहात (Metacarpals)प्रत्येकी 5 अस्थी
तळहातातील बोटे
प्रॉक्झीमल फॅलेन्जसप्रत्येकी 5 अस्थी
इंटरमेडिएट फॅलेन्जसप्रत्येकी 4 अस्थी
डिस्टल फॅलेन्जसप्रत्येकी 5 अस्थी
हिप बोन्स2 अस्थी
मांडी (Femur)2 अस्थी
(गुडघा Patella)2 अस्थी
Tibia2 अस्थी
पाय (Fibula)2 अस्थी
तळपाय (Tarsals)प्रत्येकी 7 अस्थी
तळपाय (Metatarsals)प्रत्येकी 5 अस्थी
तळपायातील बोटे
प्रॉक्झीमल फॅलेन्जसप्रत्येकी 5 अस्थी
इंटरमेडिएट फॅलेन्जसप्रत्येकी 4 अस्थी
डिस्टल फॅलेन्जसप्रत्येकी 5 अस्थी
अस्थी नाव आढळ/ ठिकाण 
शरीरातील सर्वात लहान अस्थीस्टेप्समध्यकर्णात आढळते
शरीरातील सर्वात मोठी अस्थीफीमरमांडीमध्ये आढळते
शरीरातील सर्वात मजबूत अस्थीमॅंडिबल जबडयामध्ये आढळते

संयुक्त आणि त्याचे प्रकार

3 प्रकारचे सांधे आहेत.

 1. तंतुमय सांधे: हा एक स्थिर सांधे आहे आणि त्याला स्थावर सांधे म्हणून ओळखले जाते आणि जिथे हाडे लवचिक नसतात तिथे ते असतात. उदा- बरगडी पिंजरा, पाठीचा कणा
 2. उपास्थि सांधे: उपास्थि सांधे अंशतः जंगम सांधे असतात. उदा: पाठीचा स्तंभ आणि बरगडी.
 3. सायनोव्हियल सांधे: सायनोव्हियल सांधे हा सर्वात सामान्य प्रकारचा सांधा आहे कारण हा सांधे आपल्याला चालणे, धावणे, टायपिंग आणि बरेच काही यासारख्या विस्तृत हालचाली करण्यास मदत करतो. सायनोव्हियल सांधे लवचिक, जंगम असतात, एकमेकांवर सरकतात, फिरवता येतात इ.

महत्वाचे मुद्दे

 • FeMur – सर्वात लांब हाड.
 • स्टेप्स (Stapes) – सर्वात लहान हाड.
 • शरीरात कॅल्शियम – 90% आणि फॉस्फेट – 60%.
 • शरीरात आढळणारा द्रव – सायनोव्हियल द्रवपदार्थ (Synovial Fluid)
 • RBC बोन मॅरोमध्ये निर्माण होते

हाडांचे आजार (Bone Diseases)

 • ऑस्टियोजेनेसिस (Osteogenesis)
 • Multiple myeloma.
 • मेरुदंडाची वक्रता (The curvature of the spine.)
 • Aplastic anemia
 • मुडदूस (Rickets)
 • संधिवात (Arthritis)
 • सांधे रोग (Joint disease)
 • ऑस्टियोमायलिटिस (Osteomyelitis)

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *