प्रजनन (Reproduction):
प्रत्येक सजीव स्वतः सारख्याच नवीन सजीवाची निर्मिती करतात या क्रियेलाच प्रजनन असे म्हणतात. यातील मूलभूत क्रिया म्हणजे DNA ची प्रत तयार करणे होये. या DNA च्या प्रती तयार होत असताना नेहमी काही सूक्ष्म बदल/ परिवर्तन घडून येते. त्यामुळे DNA च्या प्रति मूळ DNA सारख्या असतात. परंतु मूळ DNA शी जुळणाऱ्या नसतात.
प्रजननाचे प्रकार (Types Of Reproduction):
सजीवातील प्रजननाचे अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन हे दोन प्रकार पडतात.
अलैंगिंक प्रजनन | लैंगिक प्रजनन |
१) विखंडन २) कलिकायन / मुकुलायन ३) खंडीभवन ४) पुनरूदभवन ५) बीजाणू निर्मिती ६) शाकीय प्रजनन | – |
अलैंगिक प्रजनन (Asexual Reproduction):
जे प्रजनन युग्मकांशीवाय घडून येते त्या प्रजननास अलैंगिक प्रजनन असे म्हणतात. या पध्द्तीत फक्त एका जनुकापासून गुणसूत्री विभाजनाने नवीन सजीवाची निर्मिती होते. हे प्रजनन दोन भिन्न युग्मक पेशींच्या संयोगाशिवाय घडून येते त्यामुळे नवजात पेशी तंतोतंत मूळ पेशीसारखी असते.
अलैंगिक प्रजननाचे प्रकार:
१) विखंडन (Fission): ज्या पद्धतीमध्ये एक सजीव पेशींचे दोन किंवा अधिक सामान भागात विभाजन होते. त्यास विखंडन असे म्हणतात. दोन सामान भागात विभाजन झाल्यास त्या क्रियेला द्विविखंडन (Binary Fission) आणि अधिक भागात विभाजन झाल्यास त्या बहुविखंडन (Multiple Fission) असे म्हणतात. हि पद्धत एकपेशीय सजीवांमध्ये आढळते.
उदा. द्विविखंडन – जिवाणू, पॅरामेशिअम (आडवे विखंडन), बहुविखंडन – अमिबा, यूग्लिना (उभे विखंडन)
२) मुकुलायन (Budding):
बहुपेशीय सजीवांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर गोलाकार फुगीर रचना तयार होते त्यास मुकुल असे म्हणतात. त्यात वाढ होऊन विकसित सजीव तयार होतो जेव्हा त्या सजीवामध्ये स्वतःचे पोषण करण्याची क्षमता निर्माण होते, तेव्हा तो मूळ सजीवापासून वेगळा होतो यास मुकूलायन असे म्हणतात. उदा. हायड्रा
३) खंडीभवन (Fragmentation):
काही बहुपेशीय सजीवांचे अनेक लहान तंतुमय खंडात रूपांतर होते . पाणी व पोषद्रव्ये योग्य प्रमाणात मिळाल्यावर त्यांची वाढ होऊन नवीन सजीव तयार होतात या पद्धतीला खंडीभवन असे म्हणतात. उदा स्पायरोगायरा
४) पुनरुदभवन / पुनर्जनन (Regeneration):
काही बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या भागापासून ते पूर्ण शरीर तयार करतात यालाच पुनरुदभवन असे म्हणतात.
उदा. प्लेनेरिया, लिव्हरफ्ल्यूक
५) बीजाणू निर्मिती (Spore Formation):
काही सजीवांमध्ये लहान पानांवर बीजाणूधानी तयार होते व त्यात असंख्य बीजाणू तयार होतात. बिजानुधानी परिपकव झाल्यानंतर फुटते व त्यातील बीजाणू अनुकूल परिस्थितीत नवीन सजीवांची निर्मिती करतात, यास बीजाणू निर्मिती असे म्हणतात.
उदा. म्युकर, मॉस, रिक्सीया तसेच काही नेचे गटातील वनस्पती
६) शाकीय प्रजनन (Vegetative Propagation):
वनस्पतींच्या मूळ, खोड, पाने, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन असे म्हणतात.
उदा. खोड – बटाटा, बीट, ऊस, अद्रक, गुलाब इ.
मूळ- रताळे, गाजर, मुळा
पाने – ब्रायोफाटा (पानफुटी)
गुणसूत्री विभाजन (Mitosis) :
हा सजीवातील पेशी विभाजनाचा प्रकार असून त्यामुळे सजीवांची वाढ व विकास होतो. गुणसूत्री विभाजन फक्त कायिक पेशींमध्ये (Somatic Cells) घडून येते. कायिक पेशी म्हणजे आपल्या शरीरातील प्रजनन पेशी व्यतिरिक्त सर्व सामान्य पेशी होय.
अर्धगुणसूत्री विभाजन (Meiosis):
हे विभाजन फक्त प्रजनन पेशींमध्ये घडून येते. यामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. या विभाजनामुळेच युग्मके तयार होतात.
लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction):
जे प्रजनन युग्मकांच्या साहाय्याने घडून येते, त्यास लैंगिक प्रजनन असे म्हणतात, लैंगिक प्रजनन पध्द्तीत दोन युग्मक पेशींचा समावेश होतो. त्यांना नार युग्मक (Male Gamete) आणि मादी युग्मक (Female Gamete) असे म्हणतात.
वनस्पतीतील लैंगिक प्रजनन:
फुल हे वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचा मुख्य कार्यात्मक घटक आहे. फुलांच्या रचना विविध आकाराच्या असतात म्हणून त्यास असमान फुल (Zygomorphic) म्हणतात. फुलातील विविध रचना प्रजनन प्रक्रियेत भाग घेतात.
वनस्पतींमध्ये फुलांच्या विविध भागांच्या साहाय्याने लैंगिक प्रजननाची क्रिया खालील पध्द्तीने पूर्ण होते.
युग्मक निर्मिती (Gamate Formation):
- पुंकेसरमधील परागकोशामध्ये परागकणांची निर्मिती होते व त्यांच्या पासून पुंयुग्मक तयार होतात. परिपकव झाल्यानंतर परागकोश फुटतो व त्यातील परागकण बाहेर पडतात.
- स्त्रीकेसरमधील अंडाशयात अनेक बीजांडे तयार होतात आणि प्रत्येक बीजांडाचे रूपांतर अंडपेशींमध्ये होते.
परागीभवन (Pollination) :
परागकोशातील परागकणांचे स्त्रीकेसरच्या कुक्षीवर (Stigma) होणाऱ्या स्थानांतरणाला परागीभवन असे म्हणतात. हे परागीभवन पक्षी, कीटक, हवा, पाणी इत्यादी माध्यमातून घडून येते.
प्राण्यांतील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Animals):
काही प्राण्यांमध्ये नार आणि माधुरी ग्रंथी एकत्र असतात त्यांना उभयलिंगी प्राणी (Hermaphrodites) असे म्हणतात. उदा. लिव्हरफ्ल्यूक, हायड्रा, गांडूळ
काही प्राण्यांमध्ये नार आणि मढी ग्रंथी भिन्न सजीवांमध्ये असतात त्यांना एकलिंगी प्राणी (Unisexual Animals) असे म्हणतात.
उदा. मानव, गुरे, कुत्रा, बेडूक, मासे, सॅप, पक्षी, पाल
प्राण्यांमधील प्रजनन प्रक्रियेसाठी ते अंडी घालतात किंवा पिल्लांना जन्म देतात या आधारे त्यांचे वर्गीकरण तीन गटात केले जाते.
१) अंडज प्राणी (Oviparous) : जे प्राणी अंडी घालतात त्यांना अंडज प्राणी असे म्हणतात
उदा. बेडूक, कीटक, टोड, गोगलगाय, ऑकटोप्स, मासे, साप, पाल, पक्षी, (प्लॅटिपस आणि इकिडना सस्तनी प्राणी )
२) जरायुज प्राणी (Viviparous): जे प्राणी पिल्लांना जन्म देतात त्यांना जरायुज प्राणी असे म्हणतात.
उदा. मन, विंचू, झुरळ, देवमासा, शार्कमासा, समुद्री साप
३) अंडजरायुज प्राणी (Oviviviparous): जे प्राणी फलित अंडी विकसित करतात आणि मादीच्या शरीरातून भ्रूण बाहेर सोडले जाते त्यांना अंडजरायुज प्राणी असे म्हणतात.
उदा. गप्पी मासे (Gambusia Fish), काही कीटक
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Human Beings):
मानवातील लैंगिक प्रजनन विविध अवयवांच्या साहाय्याने घडून येते त्यांनाच मानवी प्रजनन संस्था म्हणतात.
१) पुरुष प्रजनन संस्था (Male Reproductive System): पुरुष प्रजनन संस्थेमध्ये वृषण, अधिवृषण, शुक्राणूवाहिनी, शुक्राशय, प्रोस्टेट ग्रंथी, शिश्न या अवयवांचा समावेश होतो आणि वृषण हा पुरुष प्रजनन संस्थेचा प्रमुख अवयव आहे.
२) स्त्री प्रजनन संस्था (Female Reproductive System): श्त्री प्रजनन संस्थेमध्ये अंडाशय, अंडवाहिनी, गर्भाशय, योनी या अवयवांचा समावेश होतो. यापैकी अंडाशय हा स्त्री प्रजनन संस्थेतील प्रमुख घटक आहे.
प्रजननाच्या पायऱ्या (Steps Of Reproduction):
1) युग्मक निर्मिती (Gamate Formation):
पुरुषांमध्ये वृषण या अवयवामध्ये नर युग्मकाची म्हणजेच शुक्राणूची निर्मिती होते. तसेच त्यामध्ये टेस्टोस्टेरॉन संप्रेरक तयार होते, त्यामुळे पुरुषांना त्यांचे गुणधर्म प्राप्त होतात. प्रोस्टेट ग्रंथीतून स्रवणारा स्त्राव शुक्रपेशींच्या पोषणास आणि हालचालीस मदत करतो. अंडाशयात अंडपेशींची निर्मिती होते. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके तयार होतात त्यामुळे स्त्रियांना त्यांचे गुणधर्म प्राप्त होतात.
२) फलन (Fertilization):
शुक्रपेशी गर्भाशयातून अंडवाहिनीतील अंडपेशीपर्यंत पोहोचतात. अंडपेशी आणि शुक्रपेशींचा संयोग होऊन त्यापासून युग्मनज तयार होतो या क्रियेलाच फलन असे म्हणतात. हि क्रिया शरीराच्या आत घडून येते त्यामुळे याला आंतरफलन असे म्हणतात.
काही प्राण्यांमध्ये युग्मनज सभोवतालच्या वातावरणात म्हणजेच पाण्यात सोडले जातात. तेथेच शुक्र आणि अंडपेशींचे फलन घडून येते. अशा प्रकारे शरीराबाहेर होणाऱ्या फलनास बाह्यफलन असे म्हणतात.
उदा. बेडूक, डास, इ.
३) प्रजनन (Reproduction) :
फलन झाल्यानंतर युग्मनजाचे विभाजन होऊन पेशींची गोलाकार रचना तयार होते. त्यालाच भ्रूण (Embryo) असे म्हणतात.
भ्रूणाचा संपूर्ण विकास गर्भाशयात होतो व त्याचे रूपांतर अर्भकामधे होते. विशिष्ट कालावधी नंतर अर्भकापासून पूर्ण विकसित झालेला उदरगुहेबाहेर वृषणकोशात असतात.
Nice