उत्सर्जन संस्था(Excretory System)
उत्सर्जन संस्था(Excretory System)

उत्सर्जन संस्था (Excretory System)

वनस्पतीतील उत्सर्जन (Excretion in Plants):

वायुरूप : वनस्पतींच्या अपित्वचेवर असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांना रंध्र असे म्हणतात. यामधून वायूंची देवाण-घेवाण होत असते. दिवसा प्रकाश संश्लेषण क्रियेत निर्माण झालेला ऑक्सिजन वायू तसेच रात्री श्वसन क्रियेत निर्माण झालेला कार्बन डायॉकसाईड वायू रंध्राद्वारे वातावरणात सोडला जातो.

स्थायू- द्रवरूप: टर्पेटाइन, फेनॉल्स, मॉर्फीन, निकोटीन इत्यादी पदार्थांना व्यापारीदृष्ट्या खूप महत्व आहे. इतर टाकाऊ पदार्थ राळ आणि डिंकाच्या स्वरूपात जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांत साठवले जातात. काही वनस्पतींमध्ये टाकाऊ पदार्थ कॅल्शिअम ऑक्झॅलेट आणि त्याच्यामुळे खाज सुटते. वनस्पतीमधील काही टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहेत.

उदा- रबराचा चिक, डिंक, राळ किंवा निलगिरी तेल व चंदनाचे तेल.

 

प्राण्यांतील उत्सर्जन (Excretion In Animals):

विविध प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे अवयव वेगवेगळे असतात.

प्राण्यांतील उत्सर्जन (Excretion in Animals)
अ. क्र.प्राण्यांचे नावउत्सर्जन अवयव
1.आदिजीव / अमिबासंकोची रिक्तिका
2.स्पंज, सिलेंटराटा/ हायड्राभित्तिकातील विशिष्ट पेशी
3.चपटे कृमीज्वाला पेशी
4.गांडूळनेफ्रिडीया
5.लॉबस्टरयुग्मीत हरितग्रंथी
6.खेकडाउर्ध्वहनूग्रंथी
7.कीटकमालपिघी सूक्ष्मनलिका
8.विंचूमालपिघी सूक्ष्मनलिका, कक्षांगग्रंथी
9.मोलुस्का/ गोगलगायवृक्क
10.शंखवृक्क जोडी (युग्मीत रिनल अवयव)
11.कंटकीचर्मी / तारामासाअमिबासाईट्स
12.सी – कुकुंबरश्वसनवृक्ष
13.हेमिकोर्डाटाप्रोबोसिक ग्रंथी
14.पृष्ठवंशीय प्राणीवृक्क जोडी, घामग्रंथी

मानवातील उत्सर्जन :

मानवी शरीरात चयापचय क्रियेत अनेक स्थायू, द्रव तसेच वायुरूप टाकाऊ पदार्थ तयार होतात. हे टाकाऊ पदार्थ विविध अवयव तसेच उत्सर्जन संस्थेच्या साहाय्याने शरीराबाहेर टाकले जातात.

१) यकृत (Liver): यकृताच्या साहाय्याने विविध रासायनिक तसेच विषारी पदार्थांचे विघटन करून किडणीकडे उत्सर्जनासाठी पाठविले जातात.

उदा. अमोनिया या विषारी संयुगाचे रूपांतर युरिया मध्ये करणे.

2) पित्त (Bile): यकृतामधून पित्त्त तयार होऊन ते पित्ताशयात साठविले जातात. त्याच्या साहाय्याने लहान आतड्यात इथेनॉल, मेद आणि अमोनिया सारखे आम्लयुक्त टाकाऊ पदार्थांचे विघटन केले जाते.

3) मोठे आतडे (Large Intestine): अन्नपचनानंतर तयार झालेल्या स्थायूरुप टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन मोठ्या आतड्यांच्या साहाय्याने होते.

4) त्वचा (Skin): त्वचेतील घामग्रंथींच्या साहाय्याने जास्तीचे युरीन, घाम आणि क्षारांचे उत्सर्जन केले जाते.

5) इकक्रयिन ग्रंथी (Eccrine Glands): या ग्रंथी कपाळ, तळपाय, तळहात आणि शरीरात सर्वच ठिकाणी असतात. यांच्या साहाय्याने शरीरातील जास्तीच्या पाण्याचे उत्सर्जन केले जाते.

6) फुफ्फुसे (Lungs): फुफ्फुसांच्या साहाय्याने श्वसन प्रक्रियेत तयार झालेला कार्बन डायॉकसाईड शरीराबाहेर टाकला जातो.

मानवी उत्सर्जन संस्था (Human Excretory System):

चयापचय क्रियेत तयार झालेले अमोनिया, युरिया आणि युरिक आम्ल या सारखे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ शरीराबाहेरटाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात.

उत्सर्जन संस्था (Excretory System) :

1)  वृक्काची जोडी (A Pair Of Kidneys)

2)  मूत्रवाहिनी (A Pair Of Ureters)

3) मूत्राशय (Urinary Bladder)

4) युरेथ्रा (Urethra)

वृक्क (Kidney):

  • आपल्या शरीरात दोन्ही बाजूस एक अशा दोन वृक्क असतात.
  •  वृक्कांचा आकार घेवड्याच्या बियांसारखा असून रंग लालसर तपकिरी असतो.
  • वृक्कांची लांबी 10 ते 12 cm असून रुंदी 6 cm तर जाडी  4 cm असते.
  • वृक्काचे वजन पुरुषांमध्ये 125-170 g असून स्त्रियांमध्ये 115-155 g असते.
  • वृक्काच्या बाह्य आवरणाला वलकुट (Cortex) असे म्हणतात. त्यामध्ये 8-18 पिरॅमिड / शंक्वाकृती घटक असतात, त्यांना मध्यांश (Medulla) असे म्हणतात.
  • मध्यांशासमोर मूत्रवाहिनेचे श्रोणी (Pelvis) नावाचा भाग असतो. तेथून वृक्काला ऑक्सिजनयुक्त रक्त पुरविणारी वृक्क धमनी (Renal Artery) आत शिरते तर कार्बन डायॉकसाईड रक्त वाहून नेणारी वृक्क शीर (Renal Vein) बाहेर निघते.
  • प्रत्येक मध्यांशामध्ये एक लाख याप्रमाणे प्रत्येक वृक्कात सुमारे 10 लाख मूत्र जनक नलिका असतात. त्यांना वृक्कानू (Nephron) म्हणतात.
    वृकानुमध्येच अशुध्द रक्त गाळण्याची मूलभूत क्रिया घडून येते.
  • उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते कारण त्याच्या वर यकृत ग्रंथी असते.
  • आपल्या शरीरातील रक्त वृक्कामधून दररोज 400 वेळा गाळले जाते. म्हणजे एका मिनिटाला 125 मिली एवढे रक्त गाळले जाते.
  • आपले वृक्क दररोज साधारणपणे 180-190 लीटर द्रव गाळते व त्यातून 1-1.9 लीटर मूत्र तयार होते.

वृक्काचे कार्य (Functions Of Kidney):

1) रक्तातील चयापचय क्रियेत तयार झालेले अमोनिया, युरिया व युरिक आम्ल यासारखे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणे.

2) रक्तातील अयनांचे प्रमाण संतुलित ठेवणे.

3) रक्ताचा सामु (pH) संतुलित ठेवणे.

4) रक्ताचा परासरण दाब आणि आकारमान नियंत्रित करणे.

5) वृक्कामधून क्लीस्ट्रायॉल आणि एरिथ्रो पायोटीन हि संप्रेरके तर रेनिन हे विकार तयार होते.

6) वृक्कमुळे शर्करा, अमिनो आम्ले आणि पाणी यांचे पुनःअवशोषण घडून येते.

7) वृक्कमुळे आम्ल-आम्लरींचे संतुलन तसेच रक्तदाब नियंत्रित केला जातो.

8) वृक्कामुळे बायकार्बोनेटचे (HCO3)

9) ADH (Anti Diuretic Hormone) या वृक्कातील संप्रेरकामुळे पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवले जाते.

वृक्काणू (Nephron) :

वृक्काणू (Nephron)
वृक्काणू (Nephron)

रक्तातून टाकाऊ पदार्थ वेगळे करण्याचे वृक्काचे प्रकार्यात्मक एकक (Functional Unit Of Kidney) म्हणजे नेफ्रॉन (Nephron) होय. प्रत्येक वृक्कामध्ये सुमारे दहा लाख नेफ्रॉन्स असतात. दोन्ही वृक्कांद्वारे प्रतिमिनिटाला 1.3 लिटर याप्रमाणे दिवसाला 1850 लिटर रक्त शुद्ध केले जाते.  नेफ्रॉनमध्ये रक्त गाळण्याची क्रिया तीन पायऱ्यांमध्ये घडून येते.

१) गाळणे (Filtration):

  • प्रत्येक नेफ्रॉनमध्ये कपाच्या आकाराचा, पातळ भित्तिका असलेला वरचा भाग असतो त्याला बोमन्स संपुट असे म्हणतात.
  •  त्यामध्ये असलेल्या केशिकांच्या समूहाला ग्लोमेरूलस (पाश/ गच्छ) असे म्हणतात.
  • यकृतात तयार झालेला युरिया रक्तात मिसळतो व हे रक्त ग्लोमेरूलस मधील केशिकांमधून गाळले जाते.
  • बोमन्स संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून रक्तद्रव्यातील प्रथिने, पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थांचे लहान रेणू गाळले जातात.

२) पुनः अवशोषण (Selective Reabsorption):

  • बोमन्स संपुटातून गाळलेला द्रव नंतर नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो.
  • त्या ठिकाणी गाळलेल्या द्रवातून उपयुक्त प्रथिने आणि पाणी यांचे पुन्हा अवशोषण केले जाते.

३) स्रवण (Secretion):

  • उर्वरित टाकाऊ पदार्थ असलेल्या द्रवापासून मूत्र तयार होते व ते मूत्र साठवण नलिकेत साठविले जाते.
  • यामध्ये प्रामुख्याने अमोनिया, युरिया, युरिक आम्ल आणि हायड्रोजनचे आयन असतात.

४) उत्सर्जन (Excretion):

  • मूत्रवाहिनीकडून युरीन मुत्राशयाकडे व तेथून युरेथ्रामधून शरीराबाहेर टाकले जाते.
  • आपले मूत्राशय ऐच्छिक स्नायुमय अवयव असून  त्यावर चेतासंस्थेचे नियंत्रण असते. त्यामुळे आपण नेहमी मूत्र विसर्जन करण्यावर नियंत्रण ठेवू शकतो.

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *