महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

योजनेची सुरुवात – 7 सप्टेंबर, 2005 रोजी NREGA कायद्याची नोंदणी झाल्यानंतर योजना 2 फेब्रुवारी, 2006 रोजी सुरू करण्यात आली.

उद्देश – प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील इच्छुक वयस्क व्यक्ती ला वर्षातून शंभर दिवस अकुशल रोजगाराची हमी देणे.

2 ऑक्टोबर, 2009 रोजी महात्मा गांधी जयंती दिवशी NREGA चे नाव बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) करण्यात  आले.

MGNREGA ची सुरवात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील बंदा पाली गावातून करण्यात आली

MGNREGA जी सुरुवातीला 27 राज्यातील 200 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली या दोनशे जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 23 जिल्हे बिहार राज्यातील होती तर गोवा राज्याच्या एकाही जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नव्हता

MGNREGA अंतर्गत दोन योजना समाविष्ट करण्यात आल्या

  1. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY)
  2. कामाच्या मोबदल्यात अन्नधान्य योजना (FFWP)

MGNREGA योजना ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे पुरस्कृत केली जाते

MGNREGA अंतर्गत डिसेंबर 2015 पर्यंत 6.9 कोटी खाती पोस्ट ऑफिस मध्ये करण्यात आली होती

1 एप्रिल 2008 पासून MGNREGA देशातील 660 जिल्ह्यांमध्ये 6851 तालुक्यांमध्ये व 2,57,710 ग्रामपंचायती मध्ये राबविली जात आहे.

MGNREGA अंतर्गत मजुरी रोजगार दर निश्‍चितीसाठी ग्राहक किंमत निर्देशांक हा निर्देशांक वापरला जातो.

MGNREGA अंतर्गत मजुरी व साहित्य साधनसामग्री खर्चाचे प्रमाण केंद्र व राज्यात 60:40% असे आहे

MGNREGA अंतर्गत लाभार्थी कामगारांना मिळणारे लाभ

कामगाराचे नाव नोंदणी अर्ज केल्यानंतर जॉब कार्ड दिले जाते

नाव नोंदणी नंतर पंधरा दिवसात 15 पाच किलोमीटर अंतराच्या आत काम उपलब्ध करून दिले जाते

जर कामाचे अंतर पाच किलोमीटर पेक्षा जास्त असेल तर दहा टक्के अधिक मजुरी दिली जाते

कामगारांना कामाच्या ठिकाणी पेयजल प्रथमोपचार   पाळणाघर अशा सुविधा पुरविल्या जातात

यासाठी नाव नोंदणी केल्यानंतर जर 15 दिवसाच्या आत रोजगार मिळाला नाही तर बेरोजगार भत्ता दिला जातो

कामगार कामाच्या ठिकाणी अपघात किंवा मृत्यू झाल्यास संपूर्ण खर्च योजनेतून केला जातो

MGNREGA अंतर्गत ग्रामपंचायत कामाची निर्धारण कामाची अंमलबजावणी सामाजिक लेखापरीक्षण इत्यादी भूमिका पार पडते

ग्रामपंचायतीमध्ये कामाची अर्ज स्वीकारणे अर्जाची नोंदणी करणे अर्जांची छाननी करणे जॉब कार्ड देणे मजुरीची नोंद ठेवणे योजनेचा प्रसार करणे व पंधरा दिवसांच्या आत रोजगार देणे इत्यादी कामे केली जातात

MGNREGA अंतर्गत स्त्री-पुरुषांना समान वेतन दिले जात असून ते त्यांच्या बँक किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाते

सुरुवातीला MGNREGA अंतर्गत दोन हजार सहा सात मध्ये प्रति दिवस प्रति कामगार 65 रुपये वेतन दिले जाते सध्या विविध राज्यात ते वेगवेगळे दराने दिले जाते

MGNREGA अंतर्गत सर्वाधिक वेतन हरियाणा राज्यात 251 रुपये दिले जाते दुसरा क्रमांक केरळ 229 रुपये तिसरा क्रमांक पंजाब 210 रुपये महाराष्ट्र राज्यात प्रति दिवस प्रति कामगार 181 रुपये वेतन दिले जाते

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.