21 जुलै चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams
21 जुलै चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 21 July 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२१ जुलै चालू घडामोडी

हन्ली अँड पार्टनर्स पासपोर्ट निर्देशांक 2022

भारताचा क्रमांक या यादीत 87. 2022 च्या हेन्ली अँड पार्टनर्स पासपोर्ट निर्देशांकानुसार जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाकडे सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहेत.

दरम्यान, भारत या यादीत 87 व्या क्रमांकावर आहे.

सर्वात कमकुवत पासपोर्ट, पुन्हा एकदा, अफगाणिस्तान या देशाचा आहे. अफगाणिस्तानचे लोक व्हिसाशिवाय केवळ २७ देशांना भेट देऊ शकतात.

जलै 2022 मध्ये सर्वोत्तम पासपोर्ट आहेत:

  • जपान (१९३ व्हिसा मुक्त गंतव्ये )
  • सिंगापूर, दक्षिण कोरिया (१९२ )
  • जर्मनी, स्पेन (190 )
  • फिनलंड, इटली, लक्झेंबर्ग (189 )
  • ऑस्ट्रिया, डेन्मार्क, नेदरलँड, स्वीडन (188 )

नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू.

दरौपदी मुर्मु यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड (16वी राष्ट्रपती निवडणूक)

त्या भारताच्या दुसऱ्या महिला तर आतापर्यंतच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत. यापूर्वी प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कार्य केले‌.

नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू.

राष्ट्रीय सशस्त्र सेना ध्वज दिन

राष्ट्रीय सशस्त्र सेना दिवस हा भारताचा राष्ट्रीय ध्वज दिवस म्हणूनही ओळखला जातो.

दरवर्षी 7 डिसेंबर रोजी हा दिन साजरा करण्यात येतो.

उद्दिष्ट :- सशस्त्र दलांच्या भल्यासाठी लोकांकडून निधी गोळा करणे.

28 ऑगस्ट 1949 रोजी भारताच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या अधिपत्याखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दरवर्षी 7 डिसेंबर रोजी ध्वज दिन पाळण्याचा निर्णय घेतला.


मोहम्मद शमी हा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 150 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे

मोहम्मद शमी हा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 150 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे
मोहम्मद शमी हा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 150 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे

कनिंग्टन ओव्हल येथे झालेल्या पहिल्या भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय सामन्यात मोहम्मद शमी हा सर्वात जलद 150 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला.

या वेगवान गोलंदाजाला 150 एकदिवसीय विकेटसाठी 80 सामन्यांची गरज होती.

शमीने सामन्यातील दुसऱ्या विकेटसह ही कामगिरी केली.

शमी अफगाणिस्तानच्या राशिद खानसह 150 एकदिवसीय विकेट्स पूर्ण करणारा तिसरा संयुक्त-जलद आहे.


खेड-भीमाशंकर राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

खेड-भीमाशंकर राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा.

एकूण 70 किलोमीटर लांबूीच्या या महामार्गामुळं राजगुरूनगर (खेड), चास, वाडा, तळेघर ही महत्त्वाची शहरं जोडली जातील आणि भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ होईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.

यामुळं माळशेज घाटातला प्रवासही सुलभ होईल आणि परिसरातला शेतमाल मुंबईकडे पोहोचवण्याचा वेग वाढेल.

भीमाशंकर व माळशेज घाट हे पर्यटन वर्तुळ शक्य होईल. तसेच भीमाशंकर परिसरातील शेतीमाल मुंबई बंदराकडे पोहाचवणे सुलभ होईल. या महामार्गामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होईल. या महामार्गामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होईल व परिसराचा शैक्षणिक व औद्योगिक विकास साधण्यास मदत होईल.

  • तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर या तीर्थस्थळी येणार्‍या भाविकांच्या व पर्यटकांच्या सुविधेसाठी खुलताबाद-घृष्णेश्वर-एलोरा या राज्य महामार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.

एकूण 6 किमी लांबीच्या या महामार्गामुळे जगप्रसिध्द वेरुळ लेणी व अजिंठा लेणी वर्तुळ शक्य होईल.

दश विदेशातील येणार्‍या भाविकांना व पर्यटकांना ऐतिहासिक वारसा असलेले घृष्णेश्वर मंदिर व मंदिरापासून जवळच असलल्या एलोरा-अजिंठा लेण्यांची प्रसिध्द गुहा, या स्थळापर्यंत पोहाचवणे सुलभ होईल.

छत्रपती संभाजीनगर व अजिंठा ही दोन महत्त्वाची शहरे जोडले जाणार आहेत.

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

Q.1) नुकतेच श्रीलंकेचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत?

रानिल विक्रमसिंघे

Q.2) आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धात हर्षदा गरुडने कोणते पदक पटकावले?

सुवर्ण

Q.3) आयएसएसएफ’ नेमबाजी विश्वचषक स्पर्धात अनिष-रिदम या जोडीने कोणते पदक जिंकले?

कांस्यपदक

Q.4) दरवर्षी सरासरी किती लोक भारताचे नागरिकत्व सोडत आहे?

१.५ लाख

Q.5) कोणत्या देशात “मारबर्ग” विषाणूचा संसर्ग झाला आहे?

आफ्रिका

Q.6) “FIH महिला हॉक्की वर्ल्डकप २०२२” कोणी जिंकला आहे?

नेदरलँड्स

Q.7) नुकतेच कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात “हैप्पीनेस उत्सव” साजरा करण्यात आला आहे?

दिल्ली

Q.8) डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य किती घसरले आहे?

८०.०५ रु.

Q.9) खाद्य अन्नपदार्थांवर किती टक्के GST आकारण्यात आला आहे?

५%

Q.10) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे पुढील CEO आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

आशिष कुमार चौहान

21 जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी :

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.