महाराष्ट्रातील महानगरपालिका Municipal Corporation of Maharashtra
महाराष्ट्रातील महानगरपालिका Municipal Corporation of Maharashtra

महाराष्ट्रात एकूण २७ महानगरपालिका आहेत. २७वी पनवेल महानगरपालिका आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका बृहन्मुंबई आहे.

१८८८ मध्ये मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचा कारभार मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ नुसार चालतो. महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांचा कारभार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार चालतो.

शहरी/नागरी स्वराज्य संस्थांमधील सर्वोच्च स्तर महानगरपालिका हा आहे. भारतामध्ये १६८८ मध्ये मद्रास शहरासाठी पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आली.

महाराष्ट्रातील महानगरपालिका

अ. क्र.नावजिल्हास्थापना
कोकण प्रशासकीय विभाग
11. बृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई शहर जिल्हा,
मुंबई उपनगर जिल्हा
१८८८
22. ठाणे महानगरपालिकाठाणे१ ऑक्टोबर, १९८२
33. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाठाणे१ ऑक्टोबर १९८३
44. मीरा-भाईंदर महानगरपालिकाठाणे२८ फेब्रुवारी २००२
55. भिवंडी-निजामपूर महानगर पालिकाठाणे१६ डिसेंबर २००१
66. नवी मुंबई महानगर पालिकाठाणे१ जानेवारी १९९२
77. उल्हास नगर महानगरपालिकाठाणे१९९८
88. पनवेल महानगरपालिकारायगड१ ऑक्टोबर २०१६
99.वसई-विरार महानगरपालिकापालघर३ जुलै २००९
पुणे प्रशासकीय विभाग
101. पुणे महानगरपालिकापुणे१५ फेब्रुवारी १९५०
112. पिंपरी -चिंचवड महानगरपालिकापुणे जिल्हा, पुणे११ ऑक्टोबर १९८२
123. सोलापूर महानगरपालिकासोलापूर१ मे १९६४
134. कोल्हापूर महानगरपालिकाकोल्हापूर१५ डिसेंबर १९७२
145. सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिकासांगली९ फेब्रुवारी १९९८
नाशिक प्रशासकीय विभाग
151. नाशिक महानगरपालिकानाशिक७ नोव्हेंबर १९८२
162. मालेगाव महानगरपालिकानाशिक१७ डिसेंबर २००१
173. अहमदनगर महानगरपालिकाअहमदनगर३० जून २००३
184. धुळे महानगरपालिकाधुळे३० जून २००३
195. जळगाव महानगरपालिकाजळगाव२१ मार्च २००३
औरंगाबाद प्रशासकीय विभाग
201. औरंगाबाद महानगरपालिकाऔरंगाबाद०८ डिसेंबर १९८२
212. परभणी महानगरपालिकापरभणी१ नोव्हेंबर २०११
223. लातूर महानगरपालिकालातूर२५ ऑक्टोबर २०११
234. नांदेड – वाघाळा महानगरपालिकानांदेड२६ मार्च १९९७
अमरावती प्रशासकीय विभाग
241. अमरावतीअमरावती१५ ऑगस्ट १९८३
252. अकोलाअकोला१ ऑक्टोबर २००१
नागपूर प्रशासकीय विभागात
261. नागपूरनागपुर२ मार्च १९५१
272. चंद्रपूरचंद्रपुर२५ ऑक्टोबर २०११
महाराष्ट्रातील महानगरपालिका

Important Notes:

  • महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महानगरपालिका या ठाणे जिल्ह्यात (६) असून त्यानंतर पुणे (२) व नाशिक (२) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका ही अशी एकटी महानगरपालिका आहे जीचे कार्यक्षेत्र मुंबई व मुंबई उपनगर अश्या दोन जिल्ह्यात आहे.
  • ज्या ज्या जिल्ह्यात महानगरपालिका आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यलयी महानगरपालिका आहे, तर फक्त रायगड असा जिल्हा आहे ज्यात महानगरपालिका आहे पण त्याच्या मुख्यालयी अलिबाग येथे पालिका नाही आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल या शहरात महानगरपालिका आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत महानगरपालिका नाहीत?

महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांचा कुठलाच भाग एकाही महानगरपालिका क्षेत्रात येत नाही –

  1. कोंकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे.
  2. पुणे विभागातील सातारा जिल्हा.
  3. नाशिक विभागातील नंदुरबार जिल्हा.
  4. औरंगाबाद विभागातील जालनाउस्मानाबादबीड आणि हिंगोली जिल्हे.
  5. अमरावती विभागातील बुलढाणावाशीम आणि यवतमाळ जिल्हे.
  6. नागपूर विभागातील वर्धागडचिरोलीभंडारा आणि गोंदिया जिल्हे.

छत्तीस पैकी पंधरा जिल्ह्यांत महानगरपालिका नाही.

FAQs

महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे?

महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका बृहन्मुंबई आहे.

महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका कोणती?

पनवेल

महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती?

बृहन्मुंबई

महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत?

27

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.