मृदेची व्याख्या 

मृदा म्हणजे खडकापासून वेगळ्या असलेल्या जमिनीचा असा भूभाग, की जो वनस्पतींना आधार देतो तसेच पोषक अन्नद्रव्ये पुरवितो.
मृदा हा जीवसृष्टीचा आधार आहे. कारण मृदेवर वनस्पती जीवन तर वनस्पती जीवनावर प्राणी  व मानवी जीवन अवलंबून आहे.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मृदा हा महत्त्वाचा घटक आहे. मृदेची निर्मिती व दर्जा नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून असतो.
साधारणतः मृदा ही खडकांच्या विदरणाने तयार होते. मृदा ज्या खडकांच्या वितरणामुळे तयार झालेली असते त्या खडकांचे गुणधर्म त्या मृदेत आढळतात.

उदा. –   जांभा खडकापासून तयार झालेली मृदा तांबडी असते, तर बेसाल्ट खडकापासून तयार झालेली मृदा काळी असते. पठारावरील मृदा उथळ तर मैदानी प्रदेशातील मृदा खोल असते. तापमान व पर्जन्यमान यांचाही प्रभाव मृदेवर होत असतो.  त्यामुळेच महाराष्ट्रातील मृदेचा विचार केला तर कमी पाऊस पडणाऱ्या भागात सुपीक, तर अधिक पाऊस पडणाऱ्या भागात हलक्‍या दर्जाची मृदा आढळते.

मृदा व कृषी

मृदा म्हणजे खडकापासून वेगळ्या असलेल्या जमिनीचा असा भाग जो वनस्पतीला आधार देतो.

कमी पावसाच्या ठिकाणी मृदा सुपीक असते तर जास्त पावसाचे ठिकाण आणि मृदा मृदा चांगल्या दर्जाची नसते.

सुपीक मृदेतील घटक

हवा25%
जल25%
सेंद्रिय घटक5%
खनिज45%

एकूण 100%

पाण्याचा PH (Potential Of Hydrogen) 7

रक्ताचा पीएच 7.5

दुधाचा पियाच 6.5

जर सामू पीएच 3.5 ते दहा इतका असेल तर तिला चोपण जमीन म्हणतात त्याची सुधारणा करण्याकरिता जिप्समशेणखत टाकले जाते

मृदेची सुपीकता

पिकांची वाढ होण्याकरिता मृदेची सुपीकता अत्यंत महत्त्वाची असते. मृदेची सुपीकता ही जमिनीचा सामू काढून मोजली जाते. सामू हे मातीचे तुलनात्मक आम्ल, विम्लता दर्शविणारे परिणाम आहे. जर जमिनीचा सामू सात असेल तर ती जमीन/ मृदा उदासीन (Basic) असते. जमिनीचा सामू 7 पेक्षा अधिक असल्यास मृदा ही विम्ल (Alkaline) असते व जमिनीचा सामू 7 पेक्षा कमी असेल, तर ती जमीन आम्लधर्मीय (Acidic) असते. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असल्यास पिकांच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी सर्व अन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध असतात.  ती जमीन पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे, असे म्हटले जाते.

जमिनीचा प्रकार

1) क्षारयुक्त जमीन:

जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या क्षारांचा थर जमलेला असतो.  या जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो. या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होतो. या जमिनीची सुधारणा करण्याकरिता जमिनीत पुरेसे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा लागतो. हिरवळीची पिके घेऊनदेखील या जमिनीत सुधारणा करता येते.

2) चोपण जमीन:

चोपण जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. जमीन कोरडी झाल्यावर टणक होते, जमिनीत हवा खेळती रहात नाही, त्यामुळे पिकांची योग्य वाढ होऊ शकत नाही.  या जमिनीचा सामू 8.5 ते 10 इतका असतो. या जमिनीच्या सुधारणेकरिता जमिनीत जिप्सम शेणखतात मिसळून टाकतात.

3) चुनखडीयुक्त जमीन:

या जमिनीची जलधारण शक्ती कमी असते. जमिनीचा सामू 8 पेक्षा जास्त असतो. जमिनीत हवा व पाणी यांची पुरेसे प्रमाण पिकांकरिता उपलब्ध होत नाही.  त्यामुळे पिकांची वाढ खुंटते. या जमिनीच्या सुधारणेकरिता जमिनीची खोलवर नांगरट करतात हिरवळीच्या खतांचा भरपूर वापर केला जातो.

महाराष्ट्रातील 90% पेक्षा अधिक भाग बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला आहे.  परिणामी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते.  परंतु त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा ही महाराष्ट्रात आढळून येतात.

महाराष्ट्रात साधारणतः पुढील प्रकारच्या मृदा आढळतात

महाराष्ट्रातील मृदेचा प्रकार

काळी कसदार मृदा रेगूर मृदा

बेसाल्ट अग्निजन्य खडकापासून या मृदेची निर्मिती झाली

या मृदेत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक आहे

सिंचनाच्या आधाराने अनेक पिके मृदेवर घेतली जातात

या मृदेवर पाण्याचा निचरा लवकर होत नाही म्हणून अति सिंचनामुळे ही दलदलयुक्त ही बनते

पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याचे कारण म्हणजे चुनखडी अधिक असते

महाराष्ट्रात ही मृदा कृष्णा भीमा गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यात आढळून येते

तापी नदी खोऱ्याकडे या मृदेची सर्वाधिक जास्त जाडी सहा मीटर पर्यंत आहे

कर्नाटक कडे जाताना या मृदेचा रंग गडद काळा होते

या मूर्तीला काळा रंग ती त्यांनी फेरस मॅग्नेटाइट मुळे येतो

हे मृदा पठाराच्या पश्चिम भागाला अधिक प्रमाणात आहे

भुईमूग तांदूळ गहू ज्वारी बाजरी मका तेलबिया ऊस कापूस तंबाखू हे खाद्य व नगदी पिकांबरोबरच संत्री-मोसंबी केळी द्राक्षे डाळिंब स्ट्रॉबेरी यांसारखे अनेक फळांचे उत्पादन काळा मृदेवर घेतली जातात

2) जांभी मृदा :

मृदेच्या लॅटेराइट प्रकारांमध्ये मोडणारी ही मृदा आहे. जांभा खडकांवर दीर्घकालीन प्रक्रिया होऊन ही मृदा तयार झालेली आहे.  लोह व ॲल्युमिनियमच्या संयुगामुळे या मृदेला लाल अथवा जांभा रंग प्राप्त होतो. महाराष्ट्रात दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये ही मृदा आढळून येते.

या मृदेत नत्र, पालाश व सेंद्रिय द्रवांचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे शेतीच्या दृष्टिकोनातून ही मृदा कमी सुपीक असते.  परंतु फळपिकांच्या दृष्टीने ही मृदा अधिक उपयोगी असते. महाराष्ट्रात या मृदेतील काजू व आंबा ही फळपिके महत्त्वाची आहेत. महाराष्ट्राचा सह्याद्री डोंगर माथ्यावरील जांभी मृदेच्या थरांना ‘लॅटेराइट कॅप्स’ असे म्हणतात.  जांभी मृदेच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मृदेची धूप मोठ्या प्रमाणात होते. ही मृदा ओलावा टिकवून ठेवू शकत नाही.

त्यामुळे सिंचनाच्या दृष्टीनेही ही मृदा अयोग्य आहे

3) लालसर तपकिरी मृदा / तांबडी मृदा:

अतिप्राचीन आर्कियन, विंध्य व कडप्पा प्रकारच्या खडकापासून ही मृदा निर्माण झालेली असून, जास्त पावसाच्या प्रदेशांत तिचा विकास झालेला आहे. महाराष्ट्रात प्राचीन आर्कियन खडक असणाऱ्या पूर्व विदर्भ, उत्तर कोकण, दक्षिण कोकण या भागात विदरणापासून ही मृदा तयार झाली आहे. पूर्व महाराष्ट्रातील पिवळसर तपकिरी मृदा ही शिस्ट व निस्ट या मिश्र खडकापासून तयार झाली आहे. तर पश्‍चिम महाराष्ट्रात जांभी मृदा कठीण बेसॉल्टपासून तयार झाली आहे.

लोहाच्या संयुगाचे (Iron Peroxide) प्रमाण जास्त असल्याने या मृदेला तांबडा रंग प्राप्त झालेला आहे. या मृदेत पालाश, स्फुरद, कॅल्शियम व सेंद्रिय द्रवांचे प्रमाण कमी असते.  यातून पाण्याचा निचरा चांगला होतो व ही मृदा रासायनिक खतांना लवकर प्रतिसाद देते. परंतु, या मृदेची सुपीकता कमी असल्याने शेतीसाठी कमी उपयोगी ठरते. महाराष्ट्रात पश्चिम घाट प्रदेश तसेच भंडारा, गोंदिया,  चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आढळून येते. या मृदेत महाराष्ट्रात प्रामुख्याने सागाची वने आढळून येतात.

4) गाळाची मृदा :

या मृदेचा रंग फिकट पिवळा असतो.  यात पोटॅशचे प्रमाण कमी असते. वाळूमिश्र्रित लोम प्रकारच्या या मृदेत सेंद्रिय द्रव  व ह्यूमसचे चे प्रमाण जास्त असते. तसेच या मृदेची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमतादेखील जास्त असते.  त्यामुळे ही मृदा सुपीक असते. नद्यांच्या काठावर, किनारपट्टी भाग व प्रदेश यात गाळाची मृदा आढळते.  या मृदेत जलसिंचनाच्या सहाय्याने जी उन्हाळी शेती केली जाते तिला वायंगण शेती असे म्हणतात.

महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतात  उगम पावून कोकणात उतरणार्‍या नद्या स्वतःबरोबर मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून आणतात.  हा गाळ या नद्यांच्या मुखाजवळ खाड्यांच्या काठावर साठवला गेल्याने अशा ठिकाणी गाळाच्या मृदेची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्रात या मृदेत भात, नाचणी, नारळ, पोफळी ही पिके घेतली जातात.

5) दलदलीची मृदा :

कोकणातून वाहणाऱ्या नद्यांच्या मुखांशी व खाड्यांच्या परिसरात गाळाच्या मृदा पाणथळ व खारवट बनतात.  भरतीच्या पाण्याने या मृदांवर क्षार पसरतात. या मृदांचे खार मृदेमध्ये रूपांतर होते व त्या अनुत्पादक होतात.  महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत खाड्यांच्या मुखालगतच्या प्रदेशात अशा प्रकारच्या मृदा आहेत.

या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अरबी समुद्रालगत दलदलीची मृदा तसेच वर्धा- वैनगंगेच्या खो-यात राखड तपकिरी मृदा आढळते.

मृदेची धूप

मृदेची धूप म्हणजे पावसाच्या पाण्याने नद्या-नाल्यांना जमिनीवरचा सुपीक थर वाहून जाऊन जमीन नापीक होणे म्हणजेच मृदेची धूप होईल

मृदेची निर्मिती ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे धूप हीसुद्धा नैसर्गिक प्रक्रिया आहे

राज्यातील मृदेच्या दूर च्या प्रमाणावर राज्याचे तीन विभाग पडलेले आहे

कमी धूप विभाग

पश्चिम पठार पर्जन्यछायेचा प्रदेश विदर्भाचा मध्यभाग

मध्य धूप विभाग

उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रातील सातपुडा डोंगर रांगा तापी पूर्णा चे खोरे

जास्त धूप विभाग

सह्याद्रीचा पश्चिम उतार

दक्षिण कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी

सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगर रांगा

सातमाळा-अजिंठा शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट दक्षिण महाराष्ट्रातील नद्यांचे खोरे

मृदेच्या धूपेचे प्रकार

नाली धूप

पर्वतावर पाऊस पडतो मग तिथून नाले वाहतात व ते आपल्या सोबत मृदा वाहून नेतात

पर्वतीय प्रदेशात पावसामुळे अनेक नाले वाहू लागतात त्यामुळे पर्वत उतारावर खोल घड्या निर्माण होतात व फार मोठ्या प्रमाणावर धूप होते धूप च्या या प्रकाराला नाली धूप अथवा घडी धूप असे म्हणतात

सह्याद्री महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगा व सातपुडा पर्वत मी पर्वतीय प्रदेशात या प्रकारची धूप होते

चादर धूप

उदरावर जोरदार वृष्टी च्या वेळी पाण्याचे लोटे वाहत येतात त्याचबरोबर मृदेचा विस्तृत थर वाहून जाते यालाच चादर धूप असे म्हणतात

महाराष्ट्र पठारावर होणारी धूप या प्रकारचे असते

झोड धूप

पावसाच्या थेंबाच्या आकार व रीतीने झालेल्या जमिनीच्या धूपला झोड धूप म्हणतात. मातीचे शितोळे फुकले जातात.

कडाच्या पडझडीची धूप

खूप पाऊस पडत असताना पाणी जमिनीत खोल पर्यंत मूर्ती व खालच्या खडकाच्या किंवा कठीण जमिनीच्या थरामुळे आणखी खाली पाणी जाऊ शकत नाही तेव्हा पाण्याच्या दाबाने पूर्ण बाजूचा भाग कोसळतो असे कोसळण्याचे प्रकार घाटांमध्ये खिंडीमध्ये दिसून येतात

नदीकाठची होणारी धूप

नद्या आणि नाले आपला मार्ग बदलतात व एका किनाऱ्याची जमीन कापड दुसऱ्या किनाऱ्यावर रेती आणि पोयटा साठवितात

वाऱ्याने होणारी धूप

महाराष्ट्रात मृदेच्या धुपेची कारणे

जमिनीचा उतार

महाराष्ट्राच्या पठाराला असलेला मंद उतार तसेच सह्याद्री सातपुडा या ठिकाणी असणारे तीव्र उतार या भागात मोठ्या प्रमाणात धूप होतांना दिसून येते

पावसाचे प्रमाण

मृदेचा आकार काळ्या मृदेची जलधारण शक्ती जास्त असल्याने काळ्या मृदेची धूप कमी होते तर जांभी तांबडी या मृदेत पाण्याचे   निचरण जलद गतीने होत असल्याने या मृदेची धूप मोठ्या प्रमाणावर होते

वृक्षतोड

सह्याद्री पर्वत व सातपुडा वर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते

चराऊ चराऊ जनावरे यांचा अतिवापर

स्थलांतरित शेती

गोंदिया गडचिरोली आता नाशिक या भागात शेतीसाठी जंगलतोड केली जाते वही हिला भदकी शेती म्हणतात.

महाराष्ट्राच्या सह्याद्री विभागात अशा प्रकारची शेती केली जाते

ठाणे नाशिक अहमदनगर पुणे रायगड या जिल्ह्यांच्या सह्याद्री भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित शेती केली जाते

महाराष्ट्र मृदा संधारण उपाय

महाराष्ट्रात मृदेची धूप होण्याचे प्रमाण जास्त आहे

उत्पन्न शेती च्या जवळ्पास 49% क्षेत्र धूप च्या क्षेत्रात आहे व प्रतिवर्षी वृक्षतोडीमुळे धूप क्षेत्रात वाढ होत आहे याकरिता महाराष्ट्र शासनाने मृदसंधारण विभागाची स्थापना केलेली आहे

  • वृक्ष लागवड
  • पिकांची फेरपालट
  • बांध घालने
  • पायऱ्यांची शेती

डोंगराळ भागात उतारावर पायऱ्यांची शेती केली जाते त्या जमिनीवर पायऱ्यांची निर्मिती करून शेती केल्याने मृदेची धूप कमी होते व यालाच सोपन शेती असेही म्हणतात

महाराष्ट्र मृदा संधारण उपाय :

महाराष्ट्र राज्याकडे एकूण 307 लाख हेक्टर जमीन असून त्यापैकी एक 173.68 लाख हेक्टर जमिनीवर प्रत्यक्ष पिके घेतली जातात. म्हणजेच उर्वरित जमीन बिगर कृषी वापराखाली आहे. त्यामुळे उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करण्याच्या  दृष्टिकोनातून जमिनीची धूप मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने याकरिता स्वतंत्र मृदासंधारण विभाग स्थापन केला आहे.

मृदा संधारणकरिता महाराष्ट्रात पुढील उपाय योजले जात आहे.

1) वृक्षारोपण :

वृक्षांमुळे मृदांचे कण धरून ठेवले जातात व त्यामुळे मृदेचे वाहत्या पाण्यापासून संरक्षण होते.

 2) पिकांची फेरपालट करणे :  

वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून-पालटून घेणे.  जेणेकरून जमिनीची धूप कमी होईल.

3) आच्छादने :

पीक लहान अवस्थेत असताना पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप आच्छादनामुळे कमी होते.  तसेच कुरणांमुळे देखील मृदांवर आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.

4) बांध घालने :

उतारावरच्या शेतीच्या भागात विशिष्ट उतारावर जर बांध घातले गेले तर पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने  वाहून जाणारे मृदेचे थर बांधाजवळ साठवले जातील व मृदा सपाट होण्यास मदत होईल. यासाठी पुढील पद्धतीने बांध घातले जातात.

अ)  समपातळीवरील वरंबे :

कमी पावसाच्या भागात व जमिनीत साधारणपणे 3 टक्केपर्यंत उतार असल्यास सम पातळीवरील वरंबे पाण्याला अडवू

ब) ढाळीचे वरंबे :

जास्त पावसाच्या भागात व जमिनीस साधारणपणे 5 ते 10% असल्यास ढाळीचे वरंबे पाण्याला अडवून जमिनीत पाणी मुरण्यास मदत करतात.

क) सरी-वरंबा पद्धत :

जमिनीचा उतार 1ते 3% पर्यंत असल्यास उतारास आडवे एका आड एक सरी वरंबे तयार करावे.  दोन वरंब्यामधील सरीमध्ये पावसाचे पाणी मुरले जाते व वाहणाऱ्या पाण्यास अटकाव होऊन जमिनीची धूप कमी प्रमाणात होते.

5)  जमीन नांगरतांना उताराच्या दिशेशी काटकोनात नांगरणी करणे :

काटकोनात नांगरणी केल्यास उतारावरून वाहणाऱ्या पाण्याला प्रतिबंध होऊन मृदेची धूप कमी होण्यास मदत होते

6)  पायऱ्यांची शेती :

डोंगराळ भागात जेथे उतारावर शेती केली जाते.  त्या जमिनीवर पायऱ्यांची निर्मिती करून शेती केल्यास मृदेची धूप कमी होण्यास मदत होते.  यास सोपान शेती असे म्हणतात.

महाराष्ट्राची कृषी

राज्यात मुख्य व्यवसाय शेतीचा आहे राज्याच्या स्थूल उत्पन्नात च्या कृषीचा वाटा 10.9%

2011 च्या जनगणनेनुसार कृषी व संलग्न क्षेत्राचा राज्यातील एकूण रोजगारात 52.7% वाटा आहे

महाराष्ट्रात एकूण शेतीपैकी 56% पेक्षा जास्त क्षेत्र केवळ निव्वळ लागवडीखालील आहे त्यानुसार महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो

भारतातील ऊस क्षेत्राच्या 33% क्षेत्र महाराष्ट्रात आहे व त्यातून देशाची 37% साखर उत्पादित होते

निवड पेरणी खाली सुमारे 70 पर्सेंट क्षेत्रात खरीप 30% क्षेत्रात रब्‍बी पीक घेतले जाते

महाराष्ट्र 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागात 55% लोकसंख्या राहते त्यापैकी 85% लोकसंख्येची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे

हंगाम ऋतू लागणारे पीक

खरीप जून ते सप्टेंबर पावसाळा असतो तांदूळ ज्वारी कापूस बाजरी उडीद तूर

रब्बी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हिवाळा असतो गहू हरभरा ज्वारी

जायद उन्हाळी मार्च ते मे सूर्यफूल भुईमूग पपई कलिंगड टरबूज खरबूज

महाराष्ट्रातील पिकांचे प्रकार

Click here to read

नगदी पिके

click here to read about नगदी पिके (Cash crops)

फळबाग शेती

Click here to read more

महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजारपेठ

केळी व तेलबियांचे बाजार पेठजळगाव
कांदा व लसुन चे बाजारपेठलासलगाव, नाशिक
 द्राक्षांचे बाजार पेठनाशिक
 बटाट्याचे बाजारपेठइंदापूर
 हळदीचे बाजार पेठसांगली
 डाळिंबाची बाजार पेठसांगोला
 मिरचीचे बाजार पेठकोल्हापूर
 कापसाचे बाजार पेठअकोला
 ज्वारीचे बाजार पेठसोलापूर
 संत्र्याचे बाजार पेठनागपूर
 तांदळाची बाजारपेठतुमसर
 मोसंबी चे बाजार पेठअकोला

कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे

टीप महाराष्ट्रातील कृषी निर्यात क्षेत्र आठ आहेत

फुले

  1. पुणे
  2. नाशिक
  3. कोल्हापूर

महाराष्ट्रात एकूण चार कृषी विद्यापीठे आहेत

  1. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर (स्थापना 1968): संशोधन विषय ऊस ज्वारी गहू
  2. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला (स्थापना 1969): संशोधन विषय कापूस डाळी तेलबिया गहू
  3. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी (स्थापना 1972): संशोधन विषय आंबा फलोत्पादन खारभूमी मत्स्यव्यवसाय तांदूळ
  4. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी (स्थापना 1972): संशोधन विषय ऊस कापूस ज्वारी डाळी रेशीम विकास सेरिकल्चर

पशुसंवर्धन

Click here to read more

मत्स्यव्यवसाय

खाऱ्या पाण्याच्या मत्स्योत्पादनात प्रथम क्रमांक – केरळ

गोड पाण्याच्या मत्स्य उत्पादनात प्रथम क्रमांक – पश्चिम बंगाल

महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्याचबरोबर सागरी मासेमारी करिता 1.12 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र राखीव आहे.

महाराष्ट्रात सागरी किनाऱ्यावर मासोळी उतरण्याकरिता 173 केंद्र आहे

देशातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 13.1 % इतके आहे सर्वात जास्त बोंबीलचे उत्पादन ठाणे जिल्ह्यात होते.

खोपोली (रायगड) येथे पहिला मत्स्यबीज व केंद्राची स्थापना करण्यात आली होती.

महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्रांती घडवून आणलेले आहे.

हरितक्रांती

नीळक्रांती मत्स्यउत्पादन

पित्त क्रांती गळीत धान्य तेल उत्पादन वाढविण्यासाठी

श्वेतक्रांती रेशीम उत्पादन वाढविण्यासाठी

गुलाबी क्रांती झिंगी उत्पादन वाढविण्यासाठी

इंद्रधनुष क्रांती डॉक्टर स्वामीनाथन यांनी शेती विकासासाठी सुचविलेल्या 7 सुधारणांना इंद्रधनुष क्रांती असे म्हटले जाते

सुवर्ण क्रांती फळे व मधमाशी पालन

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था

राज्य सरकार –
 तेलबिया संशोधन केंद्रजळगाव
गवत संशोधन केंद्रपालघर
 वाल्मी वॉटर अंड लांड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटऔरंगाबाद
ऊस संशोधन केंद्रपाडेगाव, सातारा
 काजू संशोधन केंद्रवेंगुर्ला, सिंधुदुर्ग
 केळी संशोधन केंद्रयावल, जळगाव
 नारळ संशोधन केंद्रभाट्ये, रत्नागिरी
हळद संशोधन केंद्रदिग्रस, सांगली
सुपारी संशोधन केंद्रश्रीवर्धन, रायगड
केंद्र सरकार –
 राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रकेगाव, सोलापुर
राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्रराजगुरूनगर, पुणे
मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्रनागपूर

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.