2५ जुलै चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams
2५ जुलै चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams

Daily Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 25 July 2022

Daily Current Affairs in Marathi: In this article, we have provided daily current affairs in Marathi. Useful for MPSC Rajyaseva, MPSC Grp B & C, Police, Talathi Bharti, and other competitive exam

RRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात.  बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.

२५ जुलै चालू घडामोडी

१ ऑगस्टपासून महामध्ये मतदार ओळखपत्र-आधार लिंकिंग मोहीम

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी सांगितले की, मतदार ओळखपत्रे आधार कार्डशी जोडली जातील.

मतदार ओळखपत्रांशी आधार लिंकिंगला अधिकृत करणारे निवडणूक कायदे (सुधारणा) विधेयक लोकसभेने डिसेंबर २०२१ मध्ये आवाजी मतदानाद्वारे मंजूर केले.

द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे १५ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली

द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे १५ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली
द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे १५ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली

सरन्यायाधीश व्ही एन रमण्णा यांनी त्यांना पदाची शपथ दिली (कलम ६० अन्वये)

भारताच्या १५व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संथाळ आदिवासी समाजाशी संबंधित आहेत

सथाळ भारतातील भिल्ल आणि गोंड नंतर ३रा सर्वात मोठा आदिवासी समाज आहे

भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या त्या ओडिशा राज्याच्या १ल्या व्यक्ती

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील ह्या एकमेव महाराष्ट्रीयन राष्ट्रपती

२५ जुलैला शपथ घेणाऱ्या द्रौपदी मुर्मु आतापर्यंतच्या १०व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत

०६वे राष्ट्रपती एन एस रेड्डी यांच्यापासून सर्व राष्ट्रपतींनी २५ जुलैलाच शपथ घेतली आहे

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा टाटा AIG सोबत करार

इडिया पोस्ट पेमेंट बँकेने (आयपीपीबी) ग्राहकांना टाटा अपघात संरक्षण विमा योजना देण्यासंदर्भात टाटा एआयजी (TATA AIG) सोबत करार केला आहे.

राज्यातील सर्व टपाल कार्यालयांत या विमा योजनेच्या प्रसाराविषयी 15 जुलैपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.

योजनेचा तपशील आणि पात्रता तपासण्यासाठी टपाल खात्याला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय :- अविवाहित महिलेच्या मुलाला कागदपत्रात केवळ आईचे नाव टाकण्याची मुभा.

ती केवळ अविवाहित माता नाहीतर या देशाची महान लेक आहे. सरकारने त्याची (याचिकाकर्ता) ओळख जाहीर न करता अन्य नागरिकाप्रमाणे त्याच्या प्रतिष्ठेची जपणूक केली पाहिजे. अन्यथा त्याला असहनीय मानसिक वेदनेला सामोरे जावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले.

आम्हाला असा समाज हवा आहे ज्यात कर्णासारखे पात्र नसेल, माता पिता माहीत नसल्याने तिरस्कार सोसावा लागून आपले जीवन अभिशाप आहे, असे कोणाला वाटू नये. महाभारताचा खरा नायक आणि योद्धा असलेला कर्ण आम्हाला हवा आहे. आमची राज्यघटना आणि न्यायव्यवस्था अशा सर्वांचे रक्षण करेल आणि नव्या युगातील कर्ण अन्य नागरिकाप्रमाणे सन्मानाने जगू शकतात, असे न्यायमूर्तींनी म्हटले.

नीरजचे ऐतिहासिक रुपेरी यश

नीरजचे ऐतिहासिक रुपेरी यश
नीरजचे ऐतिहासिक रुपेरी यश

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

Q.1 वर्ल्ड अथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले?
उत्तर :- रौप्य पदक

Q.2 2022 या वर्षात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार उपलब्ध झालेले आहेत?
उत्तर :- महाराष्ट्र

Q.3 Ookla चा स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स जून 2022 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे?
उत्तर :-118

Q.4 अलीकडेच खालीलपैकी कोणत्या योजनेला पाच वर्ष पूर्ण झाली आहे?
उत्तर :- प्रधानमंत्री वय वंदना योजना

Q.5 खालीलपैकी कोणाची FHI चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- सेफ अहमद

Q.6 अलीकडेच इटलीचे पंतप्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांचे नाव काय?
उत्तर :- मारियो द्रागी

Q.7 अलीकडेच कोणत्या आजाराच्या साथीने जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) आणीबाणी जाहीर केली आहे?
उत्तर :- मंकीपॉक्स

Q.8 “डेनियल अवार्ड 2022” कोनाला देण्यात आला आहे?
उत्तर :- के. पी. कुमारन

दिनविशेष

२५ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

अधिक घडामोडी :

Latest Maharashtra Govt. JobsMajhi Naukri 2022
Home PageMPSC Today
Daily Current Affairs in MarathiChalu Ghadamodi

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.