पहिली पंचवार्षिक योजना
पहिली पंचवार्षिक योजना

कालावधी: १ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६

मुख्य भरः या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता.

प्रतिमान: या योजनेसाठी हेरॉड-डोमर प्रतिमानाचा वापर करण्यात आला.

योजना खर्च:

प्रस्तावित खर्चः २३७८ कोटी रू. वास्तविक खर्च: १९६० कोटी रू.
योजनेचे उपनाव: पुनरुत्थान योजना

उद्दिष्टे :

1. दुसऱ्या महायुद्धामुळे व भारताच्या फाळणीमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था सावरून भारतीय अर्थव्यवस्थेत समतोल निर्माण करणे.

2. देशातील उपलब्ध साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन रोजगार वाढविणे व लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे.

3. अर्थव्यवस्थेतील चलन फुगवट्यावर नियंत्रण.

हाती घेण्यात आलेले प्रकल्प:

  1. दामोदर खोरे विकास योजना (दामोदर नदीच्या खोऱ्यात, झारखंड-प.बंगालमध्ये)
  2. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेशपंजाब मध्ये).
  3. कोसी प्रकल्प (कोसी नदीवर, बिहारमध्ये).
  4. हिराकूड योजना (महानदीवर, ओरिसामध्ये) (वरील सर्व प्रकल्पांची आखणी अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित करण्यात आली होती. ते बहुउद्देशिय प्रकल्प आहेत.)
  5. सिंद्री (झारखंड) येथे खत कारखाना
  6. चित्तरंजन (प.बंगाल) येथे रेल्वे इंजीनाचा कारखाना M.पेरांबूर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना
  7. HMT कारखाना बँगलोर येथे स्थापन
  8. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स: पिंपरी, पुणे
  9. १९५२ पासून ‘समुदाय विकास कार्यक्रम’ची सुरूवात

मुल्यमापन:

  1. योजना जवळजवळ सर्व बाबतीत यशस्वी झाली. कारणेi) योजना कालावधीत मान्सून अनुकूल होता. ii) योजनेची लक्ष्ये कमी होती.
  2. अन्नधान्याचे उत्पादन ५२.२ दशलक्ष टनावरून (१९५१५२) ६५.८ दशलक्ष टनांपर्यंत (१९५५-५६) वाढले.
  3. मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जाच्या पायाभूत सोयींना सुरुवात.
  4. आर्थिक वाढीचा दर: संकल्पितः २.१%, साध्यः ३.६%
  5. योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पन्न १८ टक्क्यांनी तर दरडोई उत्पन्न ११ टक्क्यांनी वाढले. तसेच किंमतींचा निर्देशांक १३ टक्क्यांनी कमी झाला. (पहिली योजना ही आतापर्यंतची एकमेव योजना आहे, ज्यादरम्यान किंमतींचा निर्देशांक कमी झाली.)

FAQs

पहिल्या पंचवार्षिक योजनेचे नाव काय आहे?

पहिल्या पंचवार्षिक योजनेला डोमर-महालानोबिस मॉडेल असेही म्हणतात. हे हॅरॉड-डोमर मॉडेलची काही बदलांसह सुधारित आवृत्ती होती. या आराखड्यात कृषी, सिंचन आणि ऊर्जा प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.

भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य लक्ष्य काय होते?

पहिल्या पंचवार्षिक योजनेत (1951-1956) कृषी विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. भारत ही कृषी आधारित अर्थव्यवस्था होती आणि बहुतांश लोकसंख्या कृषी क्षेत्रात गुंतलेली होती.

पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली?

एप्रिल १९५१

पंचवार्षिक योजनेचे जनक कोण आहेत?

पहिली पंचवार्षिक योजना 1928 मध्ये जोसेफ स्टॅलिनने यूएसएसआरमध्ये सादर केली होती.

किती पंचवार्षिक योजना होत्या?

भारताच्या एकूण 12 पंचवार्षिक योजना होत्या.

कोणती पंचवार्षिक योजना सर्वात यशस्वी ठरली?

11वी पंचवार्षिक योजना. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली त्याचा कालावधी 2007 ते 2012 असा होता. सी. रंगराजन यांनी तयार केला होता. त्याची मुख्य थीम “जलद आणि अधिक समावेशक वाढ” होती. ९% वाढीच्या उद्दिष्टाविरुद्ध ८% वाढीचा दर गाठला.

Also Read

योजनाकालावधीअध्यक्ष
पहिली पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९५१ ते ३१ मार्च १९५६पंडित जवाहरलाल नेहरू
दुसरी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१पंडित जवाहरलाल नेहरू
तिसरी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९६१ ते ३१ मार्च १९६६पंडित जवाहरलाल नेहरू(६१-६४)
लाल बहादूर शास्त्री(६४-६६)
चौथी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४श्रीमती इंदिरा गांधी
पाचवी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९७४ ते ३१ मार्च १९७८श्रीमती इंदिरा गांधी
सहावी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९८० ते ३१ मार्च १९८५श्रीमती इंदिरा गांधी/राजीव गांधी
सातवी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९८५ ते ३१ मार्च १९९०राजीव गांधी
आठवी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९९२ ते ३१ मार्च १९९७पी व्ही नरसीह राव
नववी पंचवार्षिक योजना१ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२देवेगौडा / अट्टल बिहारी वाजपेयी
दहावी पंचवार्षिक योजना१ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७अट्टल बिहारी वाजपेयी
अकरावी पंचवार्षिक योजना०१ एप्रिल २००७ ते ३१ मार्च २०१२डॉ.मनमोहन सिंग
१२ वी पंचवार्षिक योजना१ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७डॉ.मनमोहन सिंग
पचवार्षिक योजना

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.