मानवी शरीरातील क्रियांवर नियंत्रण २ संस्थांद्वारे ठेवले जाते.

१) रासायनिक संस्था (Chemical System): यामध्ये हार्मोन्स संप्रेरकांसारख्या विशेष पदार्थांचा समावेश होतो.

हार्मोन्स अंतःस्त्रावी गंथींमधून स्रवतात. हार्मोन्स हे चयापचय, मृदू स्नायूंच्या हालचाली इत्यादी हळू चालणाऱ्या प्रक्रियांचे नियंत्रण करतात.

२) चेता संस्था (Nervous System): 

व्याख्या: मानवाच्या विविध क्रियांकर नियंत्रण ठेवून या क्रियांमध्ये एकसूत्रीपणा आणणाऱ्या संस्थेला ‘चेतासंस्था’ म्हणतात.

मानवी शरीरातील चेतासंस्थेतील मेंदु, चेतारज्जू आणि चेतापेशी यांच्या साहाय्याने चेतनियंत्रण घडवून आणले जाते. यापासून आपली चेतासंस्था बनलेली असते.

मानवी चेतासंस्था तीन मुख्य अवयवांची बनलेली असते.

 1. मेंदू (Brain)
 2. चेतारज्जू (Spinal Cord)
 3. चेतापेशी (Nerve Cells)

 

चेतासंस्थेचे भाग – मानवी शरीरातील विविध ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने प्राप्त झालेल्या संवेदनांना प्रतिसाद देण्यासाठी आपली चेतासंस्था खालील तीन भागात विभागली जाते.

 • मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System)
 • परिघीय चेतासंस्था (Peripheral Nervous System)
 • स्वायत्त चेतासंस्था (Autonomous Nervous System)
 1. मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System): 
 • मध्यवर्ती चेता संस्था मेंदू आणि चेतारज्जू / मेरुरज्जू यांची बनलेली असते.
 • मेंदू भोवती कर्पर (Cranium) कवटीच्या हाडांचे संरक्षणात्मक आवरण असते. चेतारज्जूला कशेरुस्तंभाचे म्हणजेच पाठीच्या कण्याचे संरक्षणात्मक आवरण असते.
 • मध्यवर्ती चेतासंस्था आणि हाडे यांच्या पोकळीत संरक्षणात्मक आवरण असते त्यांना मस्तिष्कावरण (Meaninges) असे म्हणतात.
 • मध्यवर्ती चेतासंस्थेचे कार्य ऐच्छिक स्वरूपाचे असते, म्हणजेच शरीरातील सर्व क्रियांचे नियंत्रण आणि समन्वय घडवून आणणे.

      2. परिघीय चेतासंस्था (Peripheral Nervous System): 

 • परिघीय चेतासंस्थेमध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या सर्व चेतांचा समावेश होतो. या चेता शरीरातील सर्व अवयवांना मध्यवर्ती चेतासंस्थेशी जोडण्याचे कार्य करतात.
 • परिघीय चेतासंस्थेचे कार्य ऐच्छिक प्रकारचे असते.
 •  मेंदूपासून निघणाऱ्या चेतांना कर्पार चेता (Cranial Nerves) म्हणतात, तर मज्जारज्जूपासून निघणाऱ्या चेतांना मेरुचेता (Spinal Nerves) म्हणतात.
 • मानवी शरीरात कर्पार  चेतांच्या (Cranial Nerves) 12 जोड्या तर मेरुचेतांच्या (Spinal Nerves) 31 जोड्या असतात.

3. स्वायत्त चेतासंस्था (Autonomous Nervous System):

 • स्वायत्त चेतासंस्था हि हृदय, फुप्फुस, जठर इत्यादीं अनैच्छिक अवयवांतील चेतांची बनलेली असते.
 • मानवी शरीरातील अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य स्वायत्त चेतासंस्था करतात.
 • उदा. रक्तदाबाचे नियंत्रण, पाचकरस स्त्रावण्याची क्रिया, शरीराचे तापमान

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *